काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांची ‘भारत जोडो न्याय यात्रा’ महाराष्ट्रात दाखल झाली आहे. बुधवारी (१३ मार्च) नंदुरबारमार्गे महाराष्ट्रात पोहोचलेली भारत जोडो न्याय यात्रा आता नाशिकमध्ये पोहोचली आहे. दरम्यान, राहुल गांधी यांनी त्र्यंबकेश्वर येथील ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतलं. त्यानंतर नाशिक येथे राहुल गांधी यांची सभा पार पडली. या सभेपूर्वी स्थानिक काँग्रेस नेत्यांनी राहुल गाधी यांचं जंगी स्वागत केलं. तसेच येथील एका काँग्रेस पदाधिकाऱ्याने राहुल गांधी यांना श्री विठ्ठलाची मूर्ती भेट म्हणून दिली. परंतु, राहुल गांधी यांनी ही मूर्ती स्वीकारलीच नाही, असा दावा भाजपाने केला आहे.

भाजपाने राहुल गांधी यांच्या नाशिकच्या सभेतील व्हिडीओचा काही भाग एक्सवर शेअर केला आहे. या व्हिडीओसह भाजपाने दावा केला आहे की, राहुल गांधी यांनी पंढरीच्या विठ्ठलाची मूर्ती न स्वीकारून विठू माऊलीचा आणि संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान केला आहे.

shivraj singh chauhan Maha Vikas Aghadi and Rahul Gandhi mislead the public with false promises and no development vision
शिवराजसिंह चौहान म्हणतात राहुल गांधींकड विकासाचे कुठलेही व्हीजन नाही
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Rahul Gandhi criticized media for focusing on Ambanis wedding Adani and Modi not on farmers
राहुल गांधींची माध्यमांवर आगपाखड; म्हणाले, “शेतकरी व गरिबांचा मुद्दा…”
bjp leader Kiren rijiju
“राहुल गांधी अजुनही अपरिपक्व नेते”, संसदीय कार्यमंत्री किरण रिजिजू यांची टीका
Suryakumar Yadav won the hearts of fans video viral
Suryakumar Yadav : याला म्हणतात देशभक्ती… देशाचा अपमान होताना पाहून सूर्यकुमार यादवने केलं असं काही की, तुम्हीही कराल सलाम, पाहा VIDEO
Congress leader rahul Gandhi rally in nanded
आरक्षणासाठी ५० टक्के मर्यादा तोडू! नांदेडमधील सभेत राहुल गांधींकडून मोदी लक्ष्य
Milind Gawali And Teja Devkar
पैसे संपले, अभिनेत्रीला कल्पना न देता निर्माते झाले पसार; नेमकं काय घडलेलं? मराठी अभिनेत्याने सांगितला ‘तो’ प्रसंग

भाजपाने व्हिडीओसह कॅप्शनमध्ये म्हटलं आहे की, विठू माऊलीचा करूनी अपमान, थाटतोय हा मोहब्बतचं दुकान… राहुल गांधींनी आज कहर केला महाराष्ट्रातल्या पुण्यभुमीत येऊन विठू माऊलीचा अपमान केला. त्यानंतर खोटं रेटून जनतेचाही अपमान केला आहे. राहुल गांधींना न दिसलेला विकास देशातली जनता अनुभवतेय तुम्ही मात्र आजही आजीप्रमाणे भाषण ठोकताय. ६० वर्षांपूर्वी तुमच्या आजी ज्या प्रकारे भाषणं ठोकायच्या.. त्याचप्रकारे तुम्हीही भाषणं ठोकताय…इतिहास साक्षीला आहे की इंग्रजांप्रमाणे फोडा आणि राज्य करा हा कायम काँग्रेसचा अजेंडा राहिलाय… मात्र राहुल गांधी याद राखा तुमचा हा खेळ महाराष्ट्रात रंगणार नाही. कारण हे आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य आहे. इथे अठरापगड जाती गुण्या गोविंदानं राहतात. त्यामुळे तुमची विचारधारा आमच्यावर लादू नका…

दरम्यान, भाजपाने शेअर केलेला व्हिडीओ अर्थवट असल्याचं काँग्रेसने स्पष्ट केलं आहे. तसेच राहुल गांधी यांचा संपूर्ण व्हिडीओ एक्सवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसतंय की, राहुल गांधी यांनी विठुरायाची मूर्ती स्वीकारली आहे. परंतु, सुरुवातीला मंचावरील गोंधळामुळे त्यांना ती मूर्ती घेता आली नव्हती. भाजपाने केवळ सुरुवातीचा भाग समाजमाध्यमांवर शेअर केला आहे.

हे ही वाचा >> वसंत मोरे राष्ट्रवादीची तुतारी फुंकणार? शरद पवार म्हणाले…

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राहुल गांधींचा मूर्ती स्वीकारतानाचा संपूर्ण व्हिडीओ शेअर करत भाजपाला टोला लगावला आहे. नाना पटोले यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की,
धरीला पंढरीचा चोर | गळा बांधुनिया दोर ||
हृदय बंदिखाना केला | आंत विठ्ठल कोंडीला
शब्दे केली जडाजुडी | विठ्ठल पायी घातली बेडी
सोहम शब्दाचा मारा केला | विठ्ठल काकुळती आला
आम्ही रामाचे पुजारी, हे तर रामाचे व्यापारी… ही संत जनाबाई ह्यांच्या अभंगाची ओळ या भाजपावाल्यांसाठी तंतोतंत लागू पडते. पक्ष तोडण्यापासून ते एखादा व्हिडिओ कसा तोडून-मोडून सादर करायचा, यातच भ्रष्ट भाजपा आणि त्यांचं ४० पैसेवालं आयटी सेल धन्यता मानतं. राहुल गांधी यांनी विठोबाच्या मूर्तीबरोबर जो मानसन्मान त्यांना मिळाला, तो सर्व स्वीकारला. पण त्यांचा हा व्हिडिओ भाजपावाल्यांच्या ४० पैसे पेजने चुकीच्या पद्धतीने सादर केला. तुम्ही तर राम मंदिर उभारूनसुद्धा देवाच्या नावाने राजकारण करणं, समाजात फुट पाडणं सुरू ठेवलंय. हे भाजपावाल्यांच्या नसानसात आहे. त्यामुळे आतातरी ही संकुचित वृत्ती सोडा, नाहीतर ज्या दिवशी देव कोपेल, तेव्हापासून तुमचा वाईट काळ सुरू झालाच समजा!