राहुल गांधी यांना पंतप्रधान करणं हे माझं लक्ष्य आहे. त्यामुळे माझं तुमचं सगळ्यांना आवाहन आहे की आपण सगळे त्या दृष्टीने तयारीला लागा. खासदार निवडून देण्याची हमी तुमच्याकडून हवी आहे. इथे कुणीही येईल आणि काहीही बोलून जाईल त्याने काही फरक पडत नाही. ही लढाई काँग्रेसची आहे. ज्या काँग्रेसने या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं, ज्या काँग्रेसने देशाला महासत्ता केलं त्यांना प्रश्न विचारला जातोय ७५ वर्षात काय केलं? त्यांना आपण काय करु शकतो हे दाखवून द्या असं वक्तव्य नाना पटोलेंनी सोलापुरात केलं आहे.

काँग्रेसने बँका, एलआयसी असे अनेक सार्वजनिक उपक्रम तयार केले. जनतेच्या पैशांतून जनतेसाठी हे उपक्रम आपण तयार केले आहेत. ते उपक्रम हे सरकार रोज विकून खात आहेत. ज्या काँग्रेस पक्षाचे आम्ही शिपाई आहोत, त्या शिपायाची जबाबदारी आहे की काँग्रेस पक्ष जिंकला पाहिजे. स्वातंत्र्याच्या लढाईत काँग्रेसचा शिपाई लढला तसा या निवडणुकीत लढायचं आहे असंही आवाहन नाना पटोलेंनी म्हटलं आहे.

Narendra modi Rahul Gandhi Bal Thackeray
Narendra Modi : नरेंद्र मोदींचं मविआ नेत्यांना आव्हान; बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख करत म्हणाले, “राहुल गांधींकडून…”
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
Amit Shah IMP Statement about CM Post
Amit Shah : ‘महायुतीचं सरकार आल्यास मुख्यमंत्री कोण?’ अमित शाह म्हणाले, “नेतृत्व…”
Sharad Pawar Ajit Pawar fb
Ajit Pawar : “शरद पवार राजकारणातून बाजूला झाल्यानंतर हा पठ्ठ्या…”, अजित पवारांचं सूचक वक्तव्य
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : “सुन लो ओवैसी…”, देवेंद्र फडणवीस यांचा एमआयएमला इशारा; म्हणाले, “काहीही झालं तरी…”
Amit Shah made special mention of Devendra Fadnavis in speech in shirala
अमित शहांनी फोन काढला आणि थेट फडणवीसांना लावला… म्हणाले, “पुन्हा…”
Ramesh Chennithala
Ramesh Chennithala : “हरियाणाच्या निवडणुकीतून खूप शिकायला मिळालं, त्यामुळे ८० टक्के बंडखोरांनी…”, रमेश चेन्निथला यांचं महाराष्ट्राच्या निवडणुकीबाबत मोठं भाष्य
devendra fadnavis criticize sanjay raut in nagpur
“संजय राऊतांसारख्या लोकांना मी…”, देवेंद्र फडणवीस यांची टीका; म्हणाले, “ते माझ्या उंचीचे…”

भारताचे माजी दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांनी देशासाठी बलिदान दिलं. आपल्या देशासाठी राजीव गांधींनी खूप मोठं काम केलं. ज्यावेळी राजीव गांधी पंतप्रधान झाले तेव्हा विमान चालवणारा देश काय चालवणार? अशी टीका भाजपाने केली होती. अशा भाजपाची खरं तर मला कीव येते. राजीव गांधी यांनी देश कसा चालवतात याचं उदाहरण राजीव गांधींनी घालून दिलं. राजीव गांधी कायमच म्हणायचे की या देशात प्रत्येक व्यक्तीच्या हातात जग आलं पाहिजे. ट्रंक कॉल करायला दिवस-दिवस लागायचा. संगणक राजीव गांधी यांनी आणला. कॉम्प्युटर इंजिनिअर जगाच्या पाठीवर बघायला मिळतात ही देणगी राजीव गांधींची आहे. त्यांना पंतप्रधान म्हणून अल्पकाळ मिळाला पण त्यांचं काम खूप मोठं आहे असंही नाना पटोलेंनी म्हटलं आहे.

आज देशात काय स्थिती आहे? देशाच्या जनतेला लुटणं, त्यांना गरीब करणं आणि पुन्हा त्यांना गुलामीकडे आणणं अशी मानसिकता असलेला भाजपा पक्ष सत्तेवर आहे. भाजपाला या देशाची लोकशाही मान्य नाही. महाराष्ट्रात एका काळ्या टोपीवाल्याला राज्यपालपदावर बसवलं होतं. त्या काळ्या टोपीवाल्याने राज्यपालाच्या खुर्चीवर बसून छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला, बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला, सावित्रीबाईंचा अपमान केला. यातून भाजपाची मानसिकता काय आहे ते कळतं असंही नाना पटोले यावेळी म्हणाले.