कोकणात होणारा नाणार प्रकल्प पाकिस्तानमध्ये चालला असल्याचा दावा भाजपा नेते आशिष शेलार यांनी केला आहे. यावर शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बोलतील का? असा सवालही शेलार यांनी उपस्थित केला आहे. याला विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

आशिष शेलार काय म्हणाले?

“मोदी सरकार रिफायनरी प्रकल्प भारतात आणू पाहत होते. हा प्रकल्प महाराष्ट्रातील कोकणात येणार होता. त्यामुळे कोकणातील मराठी तरुणांना रोजगार आणि गुंतवणूकीची संधी मिळणार होती. पण, इतक्या टोकाचा विरोध करण्यात आला की, हा प्रकल्प पाकिस्तानमध्ये चालला आहे. यावर उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षातील लोक बोलतील का?” असे आव्हान शेलार यांनी दिलं आहे.

हेही वाचा : अजित पवार की देवेंद्र फडणवीस, कोणते उपमुख्यमंत्री जवळचे? धनंजय मुंडे म्हणाले…

“यातून काय हेतू साध्य झाला? देशाच्या आणि मराठी माणसाच्या हिताचं काय झालं? रिफायनरी पाकिस्तानला नेण्यामागे आंतरराष्ट्रीय कट होता का?” असे प्रश्न शेलार यांनी उपस्थित केले आहेत.

हेही वाचा : “भाजपला भिडेंच्या माध्यमातून मणिपूरप्रमाणे महाराष्ट्र पेटवायचा आहे काय?” पटोले यांचा सरकारला सवाल, म्हणाले…

यावर अंबादास दानवे यांनी म्हटलं की, “नाणारचा प्रकल्प गुजरातला घेऊन जावा. आणि गुजरातला गेलेले प्रकल्प महाराष्ट्रात पाठवा, ही शिवसेनेची भूमिका आहे. कोकणवासियांना देशोधडीला लावत निर्सगाचा पूर्ण ऱ्हास करून प्रकल्प येणार असतील, तर त्याला विरोध आहे. उद्धव ठाकरे यांच्यामुळे प्रकल्प पाकिस्तानला जात असतील, तर आशिष शेलारांनी याची दखल घ्यावी.”

Story img Loader