नांदेड : शहरात १० फेब्रुवारी रोजी झालेल्या गोळीबारातील मुख्य आरोपी पकडण्यात पंजाब पोलीस व दहशतवाद विरोधी पथकाला यश आले आहे. बब्बर खालसा इंटरनॅशनलचा अतिरेकी हरविंदरसिंघ ऊर्फ रिंदा संधू याच्या सांगण्यावरूनच हा गोळीबार झाल्याचे निष्पन्न झाले आहे. नांदेड शहरातल्या गुरुद्वारा परिसरात १० फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३० वाजता एकाने केलेल्या गोळीबारात रविंद्रसिंघ दयालसिंघ राठोड (वय ३०) याचा जागीच मृत्यू झाला होता. तर गुरुमितसिंघ सेवालाल हा गंभीर जखमी झाला होता. गुरमितसिंघ याने हरविंदरसिंघ याच्या भावाची २०१५ मध्ये हत्या केली होती, त्या प्रकरणात त्याला जन्मठेपही झाली होती. २२ जानेवारी रोजी तो पॅरोल रजेवर सुटला होता. १० फेब्रुवारीला रविंद्रसिंघ व गुरमितसिंघ हे गुरुद्वारा परिसरातल्या गेट क्र.६ जवळ उभे असताना त्यांच्यावर गोळीबार झाला होता. या प्रकरणात वजिराबाद पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तीन दिवसानंतर संपूर्ण प्रकरणाचा तपास दहशतवाद विराधी पथकाकडे वर्ग करण्यात आला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा