दक्षिण अफ्रिकेतून हिमायतनगरमध्ये आलेल्या तीन प्रवाशांचा करोना अहवाल तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात आला होता. त्यापैकी दोघांचा अहवाल पॉझिटीव्ह आला असल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
मागील १५ दिवसांत विविध देशातून आलेल्या ३०० पेक्षा अधिक प्रवाशांची तपासणी करण्यात आली होती. यापैकी तीन जण बाधित आले होते. या तिघांचा जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पुण्याच्या राष्ट्रीय प्रयोग शाळेत अहवाल पाठविण्यात आला होता. यापैकी दोघांचा अहवाल ओमियोक्रॉन पॉझिटीव्ह आल्याने त्यांना हदगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात विलीगीकरणात ठेवण्यात आले आहे. हे तिघेही हिमायतनगर तालुक्यातील रहिवासी आहेत.
यामुळे जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. नागरिकांनी करोना नियमांचे पालन करून लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी बालाजी शिंदे आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नीळकंठ भोसीकर यांनी केले आहे.