नांदेड : बिलोली तालुक्यातील सावळी येथील तरुण शेतकरी राहुल सुरेश देवकरे याचा तंबाखूस धूर देणाऱ्या भटृटीत पडून गुदमरुन मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना (दि.२७) रोजी पहाटे उघडकीस आली. सावळी येथील तरुण राहुल सुरेश देवकरे (वय २७) हा गावातीलच रमाबाई देवकरे यांची शेती मागील एक वर्षापासून कसत होता. कसलेल्या शेतात तंबाखूचे उत्पन्न घेऊन तंबाखास भट्टी करून धूर देत असताना मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास अचानक त्याचा तोल जाऊन तो भट्टीत पडला. भट्टीतील धुराच्या वाफेमुळे त्याचा गुदमरून मृत्यू झाला.

घटनेची माहिती बिलोली पोलिस ठाण्यात समजताच पो.नि.अतुल भोसले यांच्या मार्गदर्शनात सावळी बिट जमादार कुमारप्रसाद गायकवाड, ए.जी.शिंदे व गावचे पोलीस पाटील बालाजी कंदमवार यांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा करून शेतकऱ्याच्या मृतदेहाची कुंडलवाडी ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी केल्यानंतर अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.

अत्यंत हलाखीची परिस्थिती व घरचा कर्ता पुरुष गेल्याने कुटुंबावर खूप मोठी आपत्ती कोसळली आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.. मयत तरुण सुरेश देवकरेच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई-वडील, भाऊ असा परिवार आहे.

Story img Loader