हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू होण्याचे प्रमाण हल्ली बरेच वाढले आहे. अतिशय तरूण मुलांना देखील हृदयविकाराचा झटका येत असल्यामुळे काळजी व्यक्त केली जात आहे. नुकतेच नांदेड येथे अशीच एक धक्कादायक घटना घडली. किनवट तालुक्यातील शिवणी या गावात लग्नाच्या रिसेप्शनची पार्टी सुरु असताना डीजेच्या तालावर एक तरुण नाचत होता. मात्र नाचता नाचता तो अचानक जमिनीवर कोसळला. त्याच्या मृत्यूमुळे एकच खळबळ उडाली. हा मृत्यू हृदयविकाराच्या झटका येऊन झाल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेचा थरकाप उडविणारा व्हिडिओ आता महाराष्ट्रभर व्हायरल झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

किनवट तालुक्यातील शिवणी या गावी १९ वर्षीय तरुण २५ फेब्रुवारी रोजी रिसेप्शन कार्यक्रमात डिजेवर नाचत असताना अचानक कोसळला. याचा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत तुम्ही पाहिले तर स्पष्टपणे दिसत आहे की, मृत्यम डिजेच्या तालावर अगदी आनंदात नाचतोय. सगळे लोक त्याच्या नाचण्याचा आनंद घेतायत, त्याला प्रतिसाद देत आहेत. पण अचानक नाचताना काही सेकंद थांबतो आणि जमिनीवर कोसळतो. काही कळण्याच्या आताच त्याचा मृत्यू होतो. या घटनेनंतर पूर्ण गावावर शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

अचानक मृत्यू झाल्याने लग्नघरात दुःखाचे वातावरण आहे. सुरुवातील लोकांना वाटले की, तो नाटक करतोय. पण थोडा वेळा तो उठत नसल्याचे लक्षात आल्यानंतर नातेवाईकांनी त्याच्या जवळ जावून त्याला उचलले. सदर तरुण कोणताही प्रतिसाद देत नसल्याचे लक्षात आल्यानंत त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

हृदयविकार टाळण्यासाठी घ्या ‘ही’ काळजी

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात अनेक जण त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. परिणामी, शरीराची हेळसांड होते आणि अनेक व्याधींना आमंत्रण मिळतं. यातच सध्या अनेक जण हृदयरोग, मधुमेह, उच्चरक्तदाब अशा समस्यांनी त्रस्त आहेत. यात हृदयविकाराचा झटका येण्याचं प्रमाणही दिवसेंदिवस वाढत असल्याचं दिसून येत आहे. वयाच्या २२-२३ वर्षाच्या तरुणांमध्येही समस्या जाणवत असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे या समस्येकडे वेळीच लक्ष दिलं पाहिजे. 

हृदयविकार टाळण्यासाठी खास टीप्स –

१. तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे हृदयाच्या धमक्यांवर परिणाम होतो. यामुळे धुम्रपान आणि मदयपानाचे सेवन करणे टाळावेत.

२. योगासने करा.

३. शक्यतो शाकाहारी जेवण करण्यावर भर द्या.

४. नियमित व्यायाम करा.

५. योग्य पद्धतीचा आणि सकस आहार घ्या.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nanded youth died by heart attack while dancing on dj shocking video viral kvg