गेल्या दोन दिवसापासून नळदुर्ग व परिसरातील गावात मुसळधार पाऊस सुरू आहे. बोरी नदीच्या पात्रात पाणी वाढल्याने नळदुर्गच्या एैतिहासीक किल्ल्यातील पाणी महालावरील मादी धबधबा सुरु झाला असल्याने आता हा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या दोन दिवसापासून शहर व परिसरात चांगला पाउस झाला आहे, दरम्यान या पावसामुळे शहरातून आणि परिसरातून बोरी नदीच्या पाणी पात्रात मोठया प्रमाणात वाढ झाली आहे, त्यामुळे या वाढलेल्या पाण्यामुळे नळदुर्गच्या एैतिहासीक किल्ल्यातील पाणी महालावरील नर मादी धबधब्यापैंकी मादी धबधबा सुरु झाला आहे. हा धबधबा नर धबधब्या पेक्षा दीड फुटाने खाली आहे त्यामुळे या दोन्ही धबधब्या पहिल्या प्रथम मादी धबधबा सुरु होतो त्यानुसार आज हा धबधबा मोठया प्रमाणात सुरु झाला आहे.

परिसरात आता पुन्हा चांगल्या प्रकारे पाउस झाला तर आणि बोरी धरण पुर्ण क्षमतेने भरले तर पाणी महालावरील नर धबधबा वाहण्याची शक्यता आहे मात्र सध्या मोठया प्रमाणात मादी धबधबा सुरु झाला असल्याने याचा आनंद पर्यटकांना लुटता येणार आहे. शिवाय किल्ल्यातील इतर प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी जाण्यासाठी किल्ल्यात मोठया प्रमाणात रस्ते ही करण्यात आले आहेत.

सध्या पावसाळा असल्या कारणाने किल्ला पाहण्यासाठी मोठया प्रमाणात पर्यटक येत आहेत त्यातच किल्ल्यातील पाणी महालावरील मादी धबधबा सुरु झाला असल्याने पर्यटकांना ही मोठी पर्वणी लाभली आहे. नळदुर्ग येथील भुईकोट किल्ल्यास खास नार- मादी धबधब्यामुळे ओळखले जाते. ऐतिहासिक वारसा व स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना असलेल्या या किल्ल्यात बोरी नदीवर सुंदर असा पाणी महल बांधलेला आहे,गेल्या तीन-चार वर्षांत अवर्षणामुळे बोरी नदीत पाणी आला नसल्याने नर-मादी धबधबा सुरू झाला नव्हता, यंदा माञ आठवड्यापासून कोसळणा-या पावसाने वरिल बाजूस असलेला बोरी धरण  तुडुंब भरले आहे. अतिरिक्त पाणी सांडव्याद्वारे बोरी नदी मार्गे किल्ल्यातील पाणी महलात येवून नर मादी धबधबा ओसंडून वाहत आहे. हे विहंगम दृश्य पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करत आहेत.

यावर्षी चांगला पाउस पडल्याने किल्ल्यातील नर-मादी दोन्ही धबधबे रविवार (२० ऑक्टोबर) सायंकाळ पासून ओसंडून वाहत आहेत. बोरीनदीचे पाणी किल्ल्यात वळवून त्यावर बांध घालत तयार करण्यात आलेल्या नर् मादी हे धबधबे येणाऱ्या पर्यटकांच्या डोळ्याचे पारणे फेडतात. 550 फूट लांब,55 फूट रुंद,70 फूट उंच असा पाणी महाल बनविण्यात आला आहे, किल्ल्याच्या उत्तरेकढून वाहत येणाऱ्या बोरी नदीचे पाणी किल्ल्यामध्ये वळवून या प्रवाहास चंद्रकोरीचा आकार देवून ते पुन्हा उत्तरेकडे वळविले आहे या पाण्याच्या मार्गात मोठा दगडी बंधारा बांधला असून त्यामध्ये दोन मोठे सांडवे सोडले आहेत या सांडव्याना नर मादी म्हणुण संबोधले जाते.हे अद्भूत दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे.

साधारण १३५१ ते १४८० या बहमनी काळात बांधलेल्या किल्ल्यात बोरी नदीवर बंधारा बांधून पाणी महलाचे बांधकाम करण्यात आले आहे. या महालाचे बांधकाम दगडी असून या महालात सुंदर असे कोरीव काम केले आहे. या महालाला दोन्ही बाजूने सांडवे सोडले असून पावसाळ्यात या दोन्ही सांडव्यातून जवळपास ६५-७० फूट उंचावरून पाणी खाली पडते. हेच ठिकाण नर-मादी धबधबा नावाने परिचित आहे. पाणी महालाच्या भिंती म्हणजेच महाल बांधले आहे. पाण्याच्या संपर्कात असलेल्या या महालात एक थेंबही पाणी पाझरून बाहेर येत नाही.