अलिबाग: शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी मोठं वक्तव्य केले आहे. सर्व बाजूंचा विचार केला तर शिवसेनेचे १६ आमदार अपात्र ठरू शकतात. पण त्याबाबत निर्णय घेण्याचा सर्वाधिकार विधानसभेचे अध्यक्ष आणि विधीमंडळाचा आहे. त्यामुळे त्यावर मी बोलणार नाही. तो निर्णय किती वेळात होईल हे महत्वाचे नाही. कधी ना कधी त्याबाबत निर्णय होणारच असे मत विधानपरिषदेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे शिंदे गटाच्या अडचणीत आगामी काळात वाढ होऊ शकते असा सुचक इशारा त्यांनी दिला आहे.

ते रायगड जिल्ह्यातील सुतारवाडी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्यानंतर माध्यमांशी बोलत होते. शिवसेनेच्या १६ बंडखोर आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी घ्यावा असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे या निर्णयाकडे संपर्ण देशाचे लक्ष आहे. आज ना उद्या याबाबत निर्णय घ्यावाच लागणार आहे. तो किती वेळात हे महत्वाचे नाही. हा निर्णय विधानसभा अध्यक्षांचा असणार आहे. त्यावर मी भाष्य करणे योग्य ठरणार नाही. मात्र सर्व बाजूंचा विचार केला तर अपात्रता झाली आहे असे सूचक वक्यव्य झिरवळ यांनी केले आहे.

Rahul Gandhi And Arvind Kejriwal.
Delhi Election 2025 : काँग्रेसला हवी ‘आप’ची साथ, ‘हात’ मिळवण्यास केजरीवालांचा नकार
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Rajya Sabha Winter Session.
Parliament Session : सभापतींना हटवण्यावरून राज्यसभेत गोंधळ, सलग दुसऱ्या दिवशी सभागृहाचं कामकाज स्थगित
Panvel Municipal Commissioner decision to build infectious disease hospital in Kalamboli
कळंबोलीत साथरोग रुग्णालय; पनवेल महापालिका आयुक्तांचा निर्णय, २७ कोटींचा खर्च अपेक्षित
Maharashtra Legislative Council Chairman post,
विधान परिषदेचे सभापतीपद कोणाकडे ?
शिवसेनेत अडीच-अडीच वर्षे मंत्रिपदे ?
शिवसेनेत अडीच-अडीच वर्षे मंत्रिपदे ?
Mahavikas Aghadi News
विरोधी पक्षनेते पदावरून महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच?
Vidhan Bhavan premises Central Vista vidhan
विधानभवन परिसराचा कायापालट, अध्यक्षपदी फेरनिवड होताच राहुल नार्वेकर यांचा पुनरुच्चार; सेंट्रल विस्टाच्या धर्तीवर विकास

हेही वाचा >>> रवी राणांच्‍या कार्यकर्त्‍यांना पोलिसांनी घेतले ताब्‍यात; साडी-चोळीचा आहेर देण्‍याचा प्रयत्‍न

त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह आगामी काळात १६ शिवसेना आमदारांच्या अडचणीत वाढ होऊ शकते असे स्पष्ट संकेत त्यांनी दिले आहेत. त्यामुळे शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यातील संबध अधिकच ताणले जाण्याची शक्यता आहे. आधीच आदिती तटकरे यांच्या मंत्रीमंडळातील सहभागामुळे रायगड जिल्ह्यातील शिवसेना आमदारांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. त्यांना पालकमंत्रीपद देऊ नका असेही स्पष्ट केले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत धुसफूस सरु आहे. अशातच झिरवळ यांच्या वक्तव्यामुळे शिवसेनेच्या त्या १६ आमदारांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.

Story img Loader