पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते काल (१७ स्प्टेंबर) रोजी मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात नामिबियातून आणलेले ८ चित्ते सोडण्यात आले. तब्बल ७० वर्षानंतर नामशेष झालेला चित्ता भारतात पुन्हा दाखल झाला. नरेंद्र मोदींचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मानण्यात येत आहे. मात्र, यावरुन शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजपावर निशाणा साधला आहे. आज अनेक वर्षांनी आपल्या देशामध्ये चित्ता हा प्राणी आला आहे. मराठीमध्ये आपण त्याला चित्ता बोलतो आणि इंग्लिशमध्ये चिता बोलतात. आम्ही पेंग्विन आणले म्हणून ते आम्हाला पेंग्विन सरकार म्हणतात. मग आम्ही त्यांना चित्ता सरकार म्हणायचे का? असा टोला उद्धव ठाकरे यांनी भाजपाला लगावला आहे. या प्रश्नावरुन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरेंना चांगलं बोलताच येत नाही. त्यांच्याकडे चांगली वाक्य नसली तर त्यांनी मला फोन करावा, असा सल्ला त्यांनी ठाकरेंना दिला आहे.
“….तर उद्धव ठाकरेंनी मला फोन करावा, मी त्यांना सांगेन”; ‘चिता’ प्रकरणावरुन नारायण राणेंचा शिवसेना पक्षप्रमुखांना सल्ला
उद्धव ठाकरेंच्या अस्तित्वावरुनही नारायण राणेनी टीका केली आहे.
Written by लोकसत्ता ऑनलाइन
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 18-09-2022 at 18:04 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Narayan rane criticism on shiv sena chief uddhav thackeray bjp want to be called chita sarkar dpj