केंद्रीय लघु, सूक्ष्म, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी मंगळवारी (१२ जुलै) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे राजनाथ सिंग यांच्यावर रागावल्याच्या पत्रकारांच्या प्रश्नावर प्रतिक्रिया दिली. “राजनाथ सिंह यांच्याशी फोनवर बोलताना उद्धव ठाकरे घरात होते. ते रागवल्याचं त्यांच्या पत्नीने पाहिले असेल. इतर कुणीही बघितले नाही,” असं मत नारायण राणे यांनी व्यक्त केलं. तसेच उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली. ते नवी मुंबईत एका कार्यक्रमासाठी आले असताना माध्यमांशी बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नारायण राणे म्हणाले, “उद्धव ठाकरे राजनाथ सिंह यांच्यावर भडकण्याबाबत जे बोलले ते फोनवरील संभाषण आहे. फोनवर बोलताना उद्धव ठाकरे घरीच होते. ते राजनाथ सिंह यांच्यावर रागावल्याचं त्यांच्या पत्नीनेच पाहिलं. इतर कुणीही ते रागावल्याचं पाहिलं नाही. ते तोंडानेच सांगत आहेत की मी रागावलो होतो.”

“उद्धव ठाकरेंनी रागवावं असे त्यांचे दिवस राहिले नाहीत”

“राजनाथ सिंह देशाचे संरक्षण मंत्री आहेत. उद्धव ठाकरेंनी रागवावं असे त्यांचे दिवस राहिले नाहीत. काय वाईट परिस्थिती आली आहे. त्यांना हात जोडत फिरावं लागत आहे,” असाही खोचक टोला राणेंनी लगावला.

हेही वाचा : संजय राऊतांविरोधात अटक वॉरंट निघताच नारायण राणेंची टीका, म्हणाले “ते काय…”

“या मंत्रीमंडळाचा विस्तार होणार नाही”; राऊतांच्या टीकेवर राणेंचं प्रत्युत्तर

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारला लक्ष्य करत त्यांच्या मंत्रीमंडळाचा विस्तार होणार नाही, असा खोचक टोला लगावला. याला प्रत्युत्तर देताना नारायण राणे म्हणाले, “या सरकारचं मंत्रीमंडळ झालंय. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आहेत. उद्धव ठाकरे व संजय राऊत यांच्याविषयीच्या प्रश्नांना मी उत्तरं देणार नाही. आज ते कुणीच नाहीत.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Narayan rane criticize uddhav thackeray over remark on rajnath singh pbs