Narayan Rane on Chhatrapati Shivaji Maharaj Statue : छत्रपती शिवाजी महाराज यांचा मालवण येथील पुतळा दोन दिवसांपूर्वी वाऱ्याच्या वेगाने कोसळला. यामुळे राज्यातील वातावरण तापलं आहे. आठ महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते. त्यामुळे विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महायुती सरकारवर तोफ डागली आहे. दरम्यान, आज रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन विरोधकांना प्रत्युत्तर दिलंय.

नारायण राणे म्हणाले, “आठ महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या पुतळ्याचं अनावरण केलं होतं. पावसाळी हवामानामुळे हा पुतळा कोसळला. यामध्ये कोणावरही आरोप वा दोष देण्याऐवजी हा पुतळा ज्यांनी बांधला, त्यांचे टेक्निशिअन्स यांची चौकशी व्हावी, कशामुळे हा पुतळा कोसळला त्याचं कारण बाहेर यावं आणि त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी माझी इच्छा आहे.”

mla sanjay rathod upset over baseless news spread against him by media
“मन दुखावले, जिव्हारी लागले…” आमदार संजय राठोड असे का म्हणाले?
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
BJP workers request party seniors that Abdul Sattar should not be minister again
काहीही करा पण मंत्रीपदी सत्तार नको, भाजप कार्यकर्त्यांचे साकडे
account wise inquiry started against clerk in case of corruption in Jijamata Hospital of Municipal Corporation in Pimpri
पिंपरी : जिजामाता रुग्णालयातील रकमेचा अपहार; लिपिकाची खातेनिहाय चौकशी
sarva jat dharm ekta manch
बांगलादेशातील हिंदू विरुद्ध अत्याचार मोदी सरकारने रोखावेत, सर्व जाती-धर्म एकता मंचची मागणी
Shivsena UBT News
Shiv Sena UBT : “ठाकरेंच्या शिवसेनेला नाकारण्याचा जनतेचा निर्णय किती योग्य, हेच पुन्हा अधोरेखित होतंय”, भाजपा नेत्याची आगपाखड
abhishek bachchan aishwarya rai
ऐश्वर्या राय-अभिषेक बच्चन दुसऱ्यांदा आई-बाबा होणार? रितेश देशमुखच्या ‘त्या’ प्रश्नावर अभिनेता म्हणाला…
jayant patil devendra fadnavis maharashtra assembly session
Video: “सासऱ्यांचाच आग्रह होता की…”, जयंत पाटलांच्या ‘त्या’ मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची मिश्किल टिप्पणी!

हेही वाचा >> Narayan Rane : “एक-एकाला घरात घुसून मारेन”, पोलिसांसमोर नारायण राणेंची मविआच्या कार्यकर्त्यांना धमकी

“निवडणुका समोर आहेत, त्यामुळे विरोधक याचं भांडवल करत आहेत. या क्षेत्रात भाजपावर आरोप करण्याजोगं किंवा टीका करू शकतील असं कोणतंही कारण मिळत नाही त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळणं हे निमित्त करून सर्वजण ठाकरे गट, शरद पवार गट आणि काँग्रेस टीका करत आहेत”, असं राणे म्हणाले.

आज आलेले पुढारी याआधी आले नव्हते

“मालवण येथे पुतळा तयार झाला. येथे संपूर्ण मालवण महाराजांंच्या पायाशी नतमस्तक झाले. पण आज आंदोलनासाठी आलेले पुढारी एकदाही नतमस्तक व्हायला आले नव्हते”, अशी टीकाही त्यांनी केली. “यातील एकानेही राष्ट्रपुरुषाचा पुतळा उभारला नाही, शाळा, बालवाडी धार्मिक स्थळे बांधली नाही. यात कशातही त्यांचं योगदान नाही. भाजपावर आरोप करण्यापलीकडे यांच्याकडे कोणतंच सामाजिक कार्य उरलेलं नाही, असं नारायण राणे म्हणाले.

स्वतःच्या वडिलांचा पुतळाही सरकारच्या पैशांनी उभारला

“मुंबईतील एक टीका कानावर आली. आम्हाला शिवद्रोह म्हणाले. उद्धव ठाकरेंकडून चांगल्या भाषेची अपेक्षाच नागी. मला त्यांना सांगावं वाटतं की, शिवसेनेच्या जन्मापासून छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदू विषयाला उदरनिर्वाहाचं साधन बनवलं. यातूनच त्यांनी पैसा कमावला. त्यांनी एकतरी पुतळा उभारला का? स्वतःच्या वडिलांचा पुतळाही भारत सरकारच्या पैशांनी उभारला. शिव्या घालणं यापलीकडे त्यांना काही कळत नाही. त्यामुळे आजची त्यांची टीका महाराष्ट्रातील जनता ओळखते”, असं म्हणत त्यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिलं.

पुतळा लवकरात लवकर बसवू

“आम्ही जिल्ह्याचा कायापालट केला. विकास झाला. सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि रोजगारनिर्मिती केली. पण अडीच वर्षांत उद्धव ठाकरेंनी एकतरी फॅक्टरी आणली का? पन्नास लोकांना तरी कामाला लावलं का? पाटबंधारे धरण बांधलं का? काही केलं नाही या माणसाने. महाराजांचा पुतळा कोसळला ही दुखदायक घटना आहे. परत पुतळा लवकरात लवकर उभारणं यासाठी आमचा प्रयत्न असेल. हा पुतळा कोसळण्यामागचं कारण शोधून कारवाई करू. यापलीकडे आम्हाला राजकारण करायचं नाही”, असं नारायण राणे म्हणाले.

Story img Loader