शनिवारी (१० सप्टेंबर) मुंबईत शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्या समर्थकांमध्ये वाद झाला. या प्रकरणानंतर शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी दादर पोलीस ठाण्यासमोर गोळीबार केल्याचा आरोप केला जातोय. याच आरोपांना घेऊन शिंदे गट आणि उद्धव ठाकरे समर्थक गट एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. दरम्यान, या प्रकरणानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सरवणकर यांची भेट घेतली. तसेच आम्ही सरवणकर यांच्या पाठीशी आहोत, अशी माहिती माध्यमांना दिली. यावेळी सरवणकर आणि त्यांनी केलेला कथित गोळीबार यावर प्रश्न विचारल्यानंतर नारायण राणे चांगलेच भडकले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >> आधी पुत्र अमित ठाकरेंचा स्वच्छता मोहिमेत सहभाग, आता पिता राज ठाकरेंचे गणेशोत्सवावर थेट भाष्य; म्हणाले…

नारायण राणे यांनी सदा सरवणकर यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी सदा सरकारणांनी केलेल्या कथिती गोळीबारावर प्रश्न विचारण्यात आला. मात्र यावेळी नारायण राणे भडकले. “गोळीबार केल्याचा तुमच्याकडे आरोप आहे का? चौकशी सुरू आहे, असे विचारा. अन्यथा मी आता तुमच्याविरोधात तक्रार दाखल करायला सांगेन,” असे नारायण राणे म्हणाले.

हेही वाचा >> ‘शेवटी तुम्हालाही मुंबईत राहायचं आहे,’ सदा सरवणकरांची भेट घेतल्यानंतर नारायण राणेंचा ठाकरेंना इशारा

पुढे बोलताना, “सदा सरवणकर यांनी गोळीबार केला नाही. त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी ५० लोक घरापर्यंत आले. मुंबईत शिंदे गटाची ताकद आहे की नाही हे आगामी काळात समजेल. मात्र शिंदे गटाची तकद आम्हाला समजली आहे. सध्या जी गोंधळ उडाला, त्याची आम्ही दखल घेत नाही. जेव्हा दखल घेऊ तेव्हा त्यांना चालणे बोलणे फिरणे अवघड होईल. मुंबईतील कायदा व सुव्यवस्था कायम राखण्याचे आम्ही काम करू,” असा इशारा राणे यांनी दिला. तसेच राज्यात भाजपा-शिंदे गटाची सत्ता आहे. पोलिसांनीही त्याची खबर घ्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Narayan rane gets angry over journalist questions on sada sarvankar prd