ठाकरे गटाच्या पदाधिकारी रोशनी शिंदे यांच्यावर शिंदे गटाच्या काही महिला कार्यकर्त्यांनी हल्ला केला आहे. रोशनी शिंदे हल्ल्याप्रकरणी महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण तापलं आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी रुग्णालयात जाऊन रोशनी शिंदे यांची भेट घेतली. याप्रकरणी पोलिसांनी अद्याप कुणावरच गुन्हा दाखल केला नाही, यावरून उद्धव ठाकरेंनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल केला. महाराष्ट्राला फडतूस गृहमंत्री लाभला, असं विधान उद्धव ठाकरेंनी केलं.
उद्धव ठाकरे यांच्या या विधानानंतर केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते नारायण राणे यांनी थेट इशारा दिला आहे. येथून पुढे देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल एकही अनुटित उद्गार काढू नये, अन्यथा परिणाम भोगण्यास तयार राहावं, असा धमकीवजा इशारा नारायण राणे यांनी दिला. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी नारायण राणे म्हणाले, “अडीच वर्षांच्या सत्ताकाळात राज्याला अधोगतीकडे नेणारे, कायदा व सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजवणारे, गुन्हेगारांना मदत करणारे निष्क्रीय माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल यापुढील काळात अनुचित उद्गार काढू नये, अन्यथा परिणाम भोगण्यास तयार राहावं.”
हेही वाचा- “हिंमत असेल तर ४८ तासांत मातोश्रीवर या”, ‘त्या’ विधानावरुन सुषमा अंधारेंचं बावनकुळेंना खुलं आव्हान
राणे पुढे म्हणाले की, नेमकं फडतूस कोण? हे राज्यातील जनतेने उद्धव ठाकरेंच्या अडीच वर्षांच्या सत्ताकाळात पाहिले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल बोलण्याची उद्धव ठाकरेंची लायकी नाही. केवळ बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र याखेरीज दुसरी त्यांची ओळखच नाही. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर अशोभनीय भाषेत टीका करू नये. अन्यथा त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील.
हेही वाचा- “…तेव्हा गद्दार गँगच्या ५५ लोकांनी भाजपा नेत्याला धू धू धुतलं”; आदित्य ठाकरेंनी सांगितला ‘तो’ किस्सा
सत्ता गेल्याच्या नैराश्यातून आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कर्तृत्वाबद्दल असूया असल्यानेच उद्धव ठाकरे खालच्या पातळीवर जाऊन असभ्य शब्दांत टीका करत आहेत. आम्ही हे कदापि खपवून घेणार नाही. २०१९ मध्ये भाजपाच्या मदतीने ज्यांचे आमदार निवडून आले, त्याच भाजपाला दगा देणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी सत्तेसाठी हिंदुत्ववादाला सोडचिठ्ठी दिली. मुख्यमंत्री असताना राज्याला अधोगतीकडे नेणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी सचिन वाझेसारख्या पोलीस अधिकाऱ्याला संरक्षण दिलं, असंही राणे म्हणाले.