रत्नागिरीतील पत्रकार शशिकांत वारीसे यांच्या मृत्यूवरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहलं आहे. आंगणेवाडी जत्रेतील भाजपाच्या सभेत रिफायनरी होणार, हे आपण ठासून सांगितल्यानंतर दुसऱ्या दिवशी शशिकांत वारीसेंची हत्या झाली. हा फक्त योगायोग समाजावा का? असा सवाल संजय राऊतांनी विचारला आहे. याबद्दल केंद्रीय मंत्री नारायण राणेंना विचारलं असता, संजय राऊतांची दखल घेतल नसल्याचं त्यांनी सांगितलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

केंद्रीय मंत्री नारायण राणे पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. “देवेंद्र फडणवीस धमक्या देणार नाहीत. भाषणात कोणत्याही धमक्या देण्यात आल्या नाही. वारसे प्रकरणाचा पोलीस करत असून, सर्व बाहेर येईल. संजय राऊतांची दखल घेत नाही. ते काय महाराष्ट्र आणि देशाचे नेते नाहीत,” असा टोला नारायण राणेंनी लागवला.

हेही वाचा : पत्रकाराच्या मृत्यू प्रकरणी उदय सामंतांचा फोटो पोस्ट केल्याने खळबळ, आता खुद्द संजय राऊतांनीच दिलं स्पष्टकीरण, म्हणाले, “हा आरोपी…”

नारायण राणेंच्या वक्तव्यानंतर संजय राऊतांनी प्रत्युत्तर देत खिल्ली उडवली आहे. “नारायण राणे आंतरराष्ट्रीय नेते आहेत. फ्रान्स, अमेरिका, लंडन येथील राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार होऊ शकतात; इतके मोठे नेते आहेत. म्हणून ते आम्हाला लहान बोलत असतील. पण, शिवसेनेने राणेंचा दोनवेळा पराभव केला. विनायक राऊतांनीही त्यांच्या पुत्राचा दोनवेळा पराभव केला आहे. नारायण राणेंची मानसिक अवस्था पाहता, त्यांच्या बोलण्याकडं लक्ष देऊ नये. आम्ही कोण आहोत, हे महाराष्ट्राला माहिती,” असं संजय राऊतांनी म्हटलं.

हेही वाचा : शशिकांत वारीसे मृत्यू प्रकरण : विनायक राऊतांचा नारायण राणेंवर गंभीर आरोप; म्हणाले, “पंढरीनाथ आंबेरकरने…”

“आम्ही डरपोक नाहीत, हे महाराष्ट्र सांगू शकतो. चौकशीचा सरोमिरा लागल्याने, आम्ही तीन-चारवेळा पक्ष बदलणारे नाहीत. आम्ही आमच्या पक्षाबरोबर इमान राखून काम करतोय. पक्षाच्या भूमिका ठामपणे मांडत राहू आणि काम करू,” असं संजय राऊतांनी सांगितलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Narayan rane internation leader say shivsena mp sanjay raut ssa