केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये राज्यातील सत्ताधारी पक्ष असलेल्या शिवसेनेवर परखड टीका केली. राणेंच्या जुहूमधील बंगल्याला मुंबई महानगर पालिकेनं नोटीस बजावल्यानंतर त्यावर उत्तर देण्यासाठी राणेंनी ही पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी आपल्या बंगल्याचं काम पूर्णपणे कायदेशीर आहे, अशी भूमिका राणेंनी मांडली. यावेळी नितेश राणेंनी म्याव म्याव आवाज काढल्याच्या मुद्द्यावर बोलताना नारायण राणेंनी सत्ताधाऱ्यांना खोचक टोला लगावला. तसेच, आपण कारवाईला घाबरत नसल्याचं देखील ते म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“मी उत्तर द्यायला समर्थ!”

यावेळी बोलताना नारायण राणेंनी आपल्यावरील आरोपांना उत्तर द्यायला आपण समर्थ असल्याचं म्हटलं. “जुहू-वांद्रेच्या इमारती बघा. त्या आधी तपासा. मुंबईत कायदेशीर-बेकायदेशीर काय हे पाहा आणि मग आमच्याकडे या. इथे काही कमी-जास्त असेल तर आम्ही बसलो आहोत ना. त्यासाठी नोटिसा वगैरे लावताय. कोण आहेत हे? चांगल्या आठवणी मिळतायत आणि जबाबदाऱ्या वाढत आहेत. मी उत्तर द्यायला समर्थ आहे”, असं राणे म्हणाले.

“मी हे सगळं कधीही विसरणार नाही”

दरम्यान, यावेळी बोलताना नारायण राणेंनी सध्या राज्यात सुरू असलेल्या राजकीय गोष्टी कधीही विसरणार नसल्याचं सांगितलं. “त्यांनी काहीही केलं, तरी मी काहीच बोलायचं नाही का? मातोश्रीला मिठाईचा पुडा पाठवायचा का? मी मेहनत केलीये सुरुवातीपासून. मी व्यावसायिक आहे. फक्त राजकारणात भाषणं करत, दुसऱ्यांकडून हत्या करवून घेण्याची कामं केलेली नाहीत. मी मेहनत करतो. इन्कम टॅक्सच्या आधी मी या मुंबईत सात नोकऱ्या केल्या आहेत. मला माझा इतिहास सांगायचा नाही. मी कष्टाने मिळवलंय सगळं, आडमार्गाने नाही. राणे चवताळतात. आपल्या शेपटावर पाय दिला, की वाघ कसा चवताळतो. मला नाही सहन होत. मी सहन करणाऱ्यांपैकी नाही. या घटना मी आयुष्यात कधी विसरणार नाही”, असं राणे म्हणाले.

Narayan Rane PC : भुजबळ ज्या गुन्ह्यासाठी आत गेले, तोच गुन्हा ‘मातोश्री’नं केलाय – नारायण राणे

“वाघ जाऊन मांजरं कशी आली?”

विधिमंडळातील ज्या प्रकरणामुळे नितेश राणेंवर कारवाईची मागणी केली गेली आणि अनेक राजकीय आरोप झाले, त्यावर राणेंनी खोचक टोला लगावला. “एक कारवाई म्याव म्यावची आहे. म्याव म्याव कोण आहे हे माहीत नाही. वाघ जाऊन मांजरं कशी आली हे कळलं नाही मला. स्वत:ला वाघ म्हणणारे मांजरीच्या आवाजाने का असे झाले कळलं नाही. नितेश एक कलाकार बनतोय याचं समाधान आहे. मांजरीचा आवाज काढलाय त्यानं. त्याच्यातला कलावंत उमगला”, अशा खोचक शब्दांत नारायण राणेंनी यावेळी निशाणा साधला.