भारतीय चलनी नोटांवर कुणाचा फोटो असावा? याबाबत सध्या देशभरात राजकीय नेत्यांकडून विविध विधानं केली जात आहेत. अलीकडेच आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेऊन, चलनी नोटांवर महात्मा गांधी यांच्यासोबत लक्ष्मी आणि गणपतीचा फोटा लावावा, अशी मागणी केली. यानंतर अनेक नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दरम्यान, विविध राजकीय नेत्यांनी अनेक महापुरुषांची नावे सूचवली. यामध्ये काहींनी देवदेवतांची नावं सूचवली तर काहींनी विद्यमान राजकीय नेत्यांचीही नावे सूचवली. संबंधित महापुरुषांमध्ये अगदी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर, बाळासाहेब ठाकरे, नरेंद्र मोदी, अशा विविध नेत्यांची नावं सूचवली. या घटनाक्रमानंतर संबंधित राजकीय नेत्यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत आहे.

भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनाही काही नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे. २५ पैशांच्या नाण्यावर नारायण राणेंचा फोटो एडिट करून, संबंधित नाणं फायनल करा, अशी मागणी नेटकऱ्यांनी केली आहे. या प्रकारानंतर भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. याप्रकरणी भाजपाच्या युवा मोर्चाने कुडाळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याबाबतचं वृत्त ‘टीव्ही ९ मराठी’ने दिलं आहे. संबंधित फोटो नेमका कुणी संपादित (एडिट) केला याबाबतची अधिकृत माहिती अद्याप समोर आली नाही.

‘चावडी’ नावाच्या फेसबूक खात्यावरूनही हा फोटो अपलोड करण्यात आला आहे. “अध्यक्ष महोदय हे फायनल करा” असं कॅप्शन देण्यात आलं आहे. संबंधित फोटो सध्या सोशल मीडियात वेगानं व्हायरल होत आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Narayan rane photo morph on 25 paise coin and demand to approve viral post rmm