भारतीय चलनी नोटांवर कुणाचा फोटो असावा? याबाबत सध्या देशभरात राजकीय नेत्यांकडून विविध विधानं केली जात आहेत. अलीकडेच आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेऊन, चलनी नोटांवर महात्मा गांधी यांच्यासोबत लक्ष्मी आणि गणपतीचा फोटा लावावा, अशी मागणी केली. यानंतर अनेक नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चलनी नोटांवर कुणाचा फोटो असावा? याबाबत विविध राजकीय नेत्यांनी अनेक महापुरुषांची नावे सूचवली. यामध्ये काहींनी देवदेवतांची नावं सूचवली तर काहींनी विद्यमान राजकीय नेत्यांचीही नावे सूचवली. संबंधित महापुरुषांमध्ये अगदी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर, बाळासाहेब ठाकरे, नरेंद्र मोदी, अशा विविध नेत्यांचा समावेश होता. दरम्यान, सोशल मीडियावर एका अज्ञात व्यक्तीने २५ पैशांच्या नाण्यावर नारायण राणेंचा फोटो संपादित केला. तसेच ‘हे नाणं फायनल करा’ अशी मागणी त्याने केली.

हेही वाचा- “अध्यक्ष महोदय, हे फायनल करा” २५ पैशांच्या नाण्यावर लावला नारायण राणेंचा फोटो, तक्रार दाखल

या प्रकारानंतर भारतीय जनता पार्टीचे नेते आक्रमक झाले असून त्यांनी संबंधित अज्ञात तरुणाविरोधात कुडाळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकारानंतर शिवसेना नेते भास्कर जाधवांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी संबंधित फोटो संपादित (एडिट) करणाऱ्या व्यक्तीचं कौतुक केलं आहे. ज्याला कुणाला ही कल्पना सुचली असेल, त्याच्या कल्पकतेला दाद दिली पाहिजे, अशी प्रतिक्रिया भास्कर जाधवांनी दिली. ते ‘एबीपी माझा’ वृत्तवाहिनीशी बोलत होते.

हेही वाचा- “…तर सरकार पायउतार व्हायला तयार” गुलाबराव पाटलांचं मोठं विधान, म्हणाले…

नाण्यावर नारायण राणेंचा फोटो लावल्याबाबत विचारलं असता भास्कर जाधव म्हणाले, “नोटांवर विविध नेत्यांचे फोटो असावेत, ही चर्चा मी ऐकली आहे. ज्याला कुणाला ही कल्पना सुचली असेल, त्याच्या कल्पकतेला दाद दिली पाहिजे, एवढंच मी याबद्दल बोलेल” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Narayan rane photo on 25 paisa coin bhaskar jadhav reaction rmm
Show comments