राज्यात सध्या शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपांचा कलगीतुरा रंगताना पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा आणि शिवसेनेकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप आणि दावे-प्रतिदावे केले जात आहेत. त्यात आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भात गंभीर आरोप केले आहेत.

राणेंच्या जुहूमधील बंगल्याला मुंबई महानगर पालिकेकडून नोटीस पाठवण्यात आल्यानंतर त्यावर राणेंनी टीका केली आहे.

Live Updates
12:05 (IST) 19 Feb 2022

सुशांतच्या घरात एक सावंत नावाचा मुलगा होता. तो कुठे गेला? गायब आहे. दिशा सालियानचा राव नावाचा मित्र गायब आहे. तिच्या बिल्डिंगमधला वॉचमन गायब आहे. या सगळ्या गोष्टी बाहेर याव्यात...

12:03 (IST) 19 Feb 2022

वाझे आता माफीचे साक्षीदार झाल्यानंतर कुंड्या बाहेर येतील

12:03 (IST) 19 Feb 2022
मी या घटना आयुष्यात कधी विसरणार नाही...

त्यांनी काहीही केलं, तरी मी काहीच बोलायचं नाही का? मातोश्रीला मिठाईचा पुडा पाठवायचा का? मी मेहनत केलीये सुरुवातीपासून. मी व्यावसायिक आहे. फक्त राजकारणात भाषणं करत, दुसऱ्यांकडून हत्या करवून घेण्याची कामं केलेली नाहीत. मी मेहनत करतो. इन्कम टॅक्सच्या आधी मी या मुंबईत सात नोकऱ्या केल्या आहेत. मला माझा इतिहास सांगायचा नाही. मी कष्टाने मिळवलंय सगळं, आडमार्गाने नाही. राणे चवताळतात. आपल्या शेपटावर पाय दिला, की वाघ कसा चवताळतो. मला नाही सहन होत. मी सहन करणाऱ्यांपैकी नाही. या घटना मी आयुष्यात कधी विसरणार नाही.

11:59 (IST) 19 Feb 2022
भुजबळ ज्या गुन्ह्यात अडीच वर्ष तुरुंगात गेले, त्याच गुन्ह्यासाठी हे का नाही तुरुंगात गेले?

भुजबळ ज्या गुन्ह्यात अडीच वर्ष तुरुंगात गेले, त्याच गुन्ह्यासाठी हे का नाही तुरुंगात गेले?

11:58 (IST) 19 Feb 2022

पुरावे द्यायचे तेव्हा मी देईनच, मी कॅबिनेट मंत्री आहे. कधी कुठे काय बोलायचं, कधी कुठे कुठले पुरावे द्यायचे हे मला कळतं

11:54 (IST) 19 Feb 2022

हत्येचं प्रकरण कधी बंद होत नाही. फाईल ओपन करता येते. हत्येचं प्रकरण कधीही उङडता येतं.

11:54 (IST) 19 Feb 2022

मी ईडीपर्यंत सगळी माहिती पोहोचवली आहे. भुजबळ अडीच वर्ष आत गेले. तसेच गुन्हे मातोश्रीचे आहेत. त्या दोघांचा सीए एकच आहे. माझ्याएवढी माहिती कुणाला नाही. मी इन्कम टॅक्सलाही दोन वर्ष होतो.

11:53 (IST) 19 Feb 2022
नितेश कलाकार बनतोय याचा आनंद आहे..

एक कारवाई म्याव म्यावची आहे. म्याव म्याव कोण आहे हे माहीत नाही. वाघ जाऊन मांजरं कशी आली हे कळलं नाही मला. स्वत:ला वाघ बोलणारे मांजर कसे झाले कळलं नाही. स्वत:ला वाघ म्हणणारे मांजरीच्या आवाजाने का असे झाले कळलं नाही. नितेश एक कलाकार बनतोय याचं समाधान आहे. मांजरीचा आवाज काढलाय त्यानं. त्याच्यातला कलावंत उमगला.

11:51 (IST) 19 Feb 2022
मी उत्तर द्यायला समर्थ आहे...

जुहू-वांद्रेच्या इमारती बघा. त्या आधी तपासा. मुंबईत कायदेशीर-बेकायदेशीर काय हे पाहा आणि मग आमच्याकडे या. इथे काही कमी-जास्त असेल तर आम्ही बसलो आहोत ना. त्यासाठी नोटिसा वगैरे लावताय. कोण आहेत हे? चांगल्या आठवणी मिळतायत आणि जबाबदाऱ्या वाढत आहेत. मी उत्तर द्यायला समर्थ आहे.

11:49 (IST) 19 Feb 2022

गुणवत्ता नसतानाही सव्वादोन वर्ष काढली ही बाळासाहेबांची पुण्याई आहे. साहेब असे नव्हते. आमच्याकडे पाहिल्यावर त्यांना आनंद वाटायचा. रंगशारदामध्ये माझ्या अर्थविषयक भाषणाचं पुस्तक प्रकाशित झालं. बाळासाहेब माझ्याबद्दल बोलले, तेव्हा तेही होते बसलेले. ते मातोश्रीला पाठवा.

11:48 (IST) 19 Feb 2022

हे सुडाचं राजकारण बंद करा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर धंदा केला. पण नाव घ्यायचं असेल, तर लोककल्याणकारी राज्य निर्माण करण्यासाठी काम करा. नुसतं व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये बोलणं. मंत्रालयात, कॅबिनेटला, सभागृहात मुख्यमंत्री जात नाही. असाही एक मुख्यमंत्री झाला हीच इतिहासात एक नोंद होईल. हेच यांचं काम आहे आणि हेच कर्तृत्व आहे.

11:47 (IST) 19 Feb 2022

गेल्या सव्वादोन वर्षात शिवसेना कार्यकर्त्यांना काय मिळालं यापेक्षा मातोश्रीच्या चमच्यांना काय मिळालं याची आज ना उद्या चर्चा होईल. शिवसैनिक हे सगळं बघत आहेत. भेटणं नाही, दर्शन नाही. मी कुणाच्या आजारपणावर बोलणार नाही. दुसरं कुणी असतं, तर पदावर राहिलं नसतं. राजीनामा दिला असता. आता उभं राहायलाही दोन-दोन माणसं लागतात. या महाराष्ट्रात अशी पाळी कुणावर आली नाही. आधी असं राजकारण नव्हतं.

11:45 (IST) 19 Feb 2022

आम्ही आठ माणसांसाठी इतकी मोठी इमारत असताना कशासाठी आणि कोणत्या कामासाठी बांधकाम वाढवणार? पण तरी नोटीस पाठवली. अशा प्रकारे शिवसेनेचा कारभार सुरू आहे.

11:45 (IST) 19 Feb 2022

एक चिनपाट कोण खासदार आहे. ते विकासाबद्दल का बोलत नाही? महाराष्ट्रात विकासाची काय अवस्था आहे? कायदा-सुव्यवस्था शिल्लक नाही, त्यावर बोला ना. मराठी माणूस उद्ध्वस्त झाला, मुंबईतून तडीपार झाला. ६६ साली मुंबईत मराठी माणूस किती आणि आज किती आहे? दोन वर्षांत मराठी माणसाच्या पोटापाण्यासाठी काही उद्योगधंदे आणले का? नाही. फक्त राजकारण.

11:44 (IST) 19 Feb 2022
रमेश मोरेची हत्या कुणी केली? का केली?

रमेश मोरे, जयंत जाधव यांची हत्या का झाली? हे आम्हाला माहिती नाही का? कुणी असं समजू नये. पण आम्ही हे काढलं नाही. अजून खोलात जाईन. स्वत: मुख्यमंत्री वॉर्डमध्ये फोन करतात. न्यायालयात फोन जातात. कसलं हे शत्रुत्व? मला काही हरकत नाही. मी शरण येणाऱ्यांपैकी नाही. मी मराठा आहे. आम्हाला कुणी राजकारण शिकवू नये. आम्ही कुणाच्या पोटावर मारलेलं नाही. कुणाच्याबाबत दुष्ट बुद्धीनं तक्रार करणार नाही.

11:41 (IST) 19 Feb 2022

बलात्कार करायचे, आपलं ऐकलं नाही म्हणून तरूण कलाकाराची हत्या करायची.मला इतिहास आठवतो. अशा काही हत्या झाल्या आहेत ज्यात खरे मारेकरी नाही सापडले.

11:40 (IST) 19 Feb 2022

त्यानंतर दिशा सालियन, सुशांतसिंहला जेव्हा कळलं, तेव्हा तो कुठएतरी बोलला की मी यांना सोडणार नाही. मग काही लोक त्याच्या घरी गेले. घरात जाऊन बाचाबाची झाली दिशा सालियानवरून. त्या बिचाऱ्याची हत्या करण्यात आली. तेव्हा कोणत्या मंत्र्याची गाडी होती? त्या बिल्डिंगचे सीसीटीव्ही गायब कसे झाले? १३ जूनला रात्री सीसीटीव्हीचे कॅमेरे नव्हते. आधी होते असं सोसायटीतले लोक सांगतात. ठराविक माणसाची अँब्युलन्स कशी आली? ती कुणी आणली? रुग्णालयात कुणी नेलं? पुरावे नष्ट कुणी केले? याची चौकशी होणार. त्यात कोणते अधिकारी होते, तेही आता तिथे राहिलेले नाहीत. तेही आता सगळं उघडं करतील.

11:38 (IST) 19 Feb 2022

आमच्याकडेही काही कागदपत्र आहेत. महाराष्ट्रात काही घटना घडल्या. ८ जूनला दिशा सालियानची बलात्कार करून हत्या केली. सांगितलं गेलं आत्महत्या केली. एक तर ती त्या पार्टीला जात नव्हती. तिला जबरदस्तीनं बोलावलं. तिचा मित्र रोहन राय यानं. त्यानंतर तिला थांबायला सांगितलं, ती थांबली नाही. ती घरी निघाली. त्यानंतर कोण कोण होते, पोलीस सुरक्षा कुणाला होतं, तिच्यावर बलात्कार होत असताना बाहेर पोलीस सुरक्षा कुणाची होती. तिच्या पोस्ट मॉर्टमचा अहवाल अजून बाहेर का आलेला नाही? ७ महिने झाले, अजून का बाहेर आला नाही? दिशा सालियान ज्या इमारतीत राहायची, त्या इमारतीच्या रजिस्टरची ८ जूनची पानं का नाहीत? कुणी फाडली?

11:36 (IST) 19 Feb 2022

आज छत्रपतींची जयंती आहे. पण त्यांच्या महाराष्ट्रात अशी कट-कारस्थानं करणाऱ्या लोकांच्या हातात सत्ता ठेवू नका, एवढीच महाराजांना विनंती आहे.

11:36 (IST) 19 Feb 2022

सिंधुदुर्गातल्याच लोकप्रतिनिधींनी राजकीय सूडबुद्धीने तक्रारी करण्याचं काम केलं आहे. एकानंही चांगलं घर बांधल्याचं कौतुक केलं नाही. या घराची सुरुवात बाळासाहेब असताना केली. प्लॉट बाळासाहेब असताना घेतला. पण हे अशा सूडबुद्धीचे लोक आज सत्तेवर आहेत हे महाराष्ट्राचं दुर्दैवं आहे.

11:32 (IST) 19 Feb 2022

बाळासाहेब ठाकरेंनी मराठी माणसासाठी शिवसेना काढली. पण आता शिवसेनेचे प्रमुखच मराठी माणसाच्या मुळावर आले आहेत. त्यांनी एक मातोश्री दुरुस्त केली, मातोश्री पार्ट टू बांधली. आम्ही काही म्हणालो का? भाजपा-शिवसेनेची सत्ता असताना मातोश्री दोनचं बेकायदेशीर बांधकाम पैसे देऊन नियमित केलं. आम्ही कधी काही बोललो नाही. मी कधी कुणाच्या घरावर, कुणाच्या नोकरीवर काही बोललो नाही.

11:31 (IST) 19 Feb 2022

या घरात माझी पत्नी, मी, दोन मुलं आणि त्यांचे दोन छोटे असे आठ लोकं आम्ही राहातो. इथे कोणत्याही प्रकारे हॉटेलिंग वगैरे चालत नाही. १०० टक्के रेसिडेन्शियल इमारत आहे. आजूबाजूच्यांनाही विचारा. असं असतानाही शिवसेनेकडून, मातोश्रीकडून नोटीस लावण्याचं काम केलं गेलं. पालिका त्यांच्याकडे आहे. सातत्याने २०१५-१६-१७ साली तक्रारी करायच्या, पालिकेकडून सगळे प्लॅन बघितले जायचे आणि काही अवैध नाही असं म्हणून उत्तर पाठवायचे.

11:30 (IST) 19 Feb 2022
१०० टक्के कायदेशीर काम मी केलं आहे...

जवळपास १३-१४ वर्ष मी या घरात येऊन झाली आहे. या इमारतीचे आर्किटेक्ट तलाठी आहेत. जगभरात त्यांचं नाव आहे. नामांकित आर्किटेक्टनी ही इमारत बांधली आहे. ती बांधल्यानंतर १९९१च्या डीसी नियमाप्रमाणे ती बांधली. ताबा देण्यात आला. ऑक्युपेशन सर्टिफिकेट बीसीसी या दोन्ही गोष्टी पालिकेने दिल्या होत्या. एकही गोष्ट अपूर्ण न ठेवता १०० टक्के कायदेशीर काम मी केलं आहे. त्यानंतर एक इंचही बांधकाम मी केलेलं नाही.

11:28 (IST) 19 Feb 2022
जुहूमधील बंगल्याला पालिकेनं पाठवलेल्या नोटिशीवर राणेंचं स्पष्टीकरण...

आज दिल्लीला होतो. बऱ्याच जणांचे फोन आले की तुमच्या घराबद्दल नोटीस मिळाली आहे. त्यामुळे म्हटलं तुमच्यासमोर येऊन जे काही वास्तव चित्र आहे, ते तुम्हाला सांगावं. या घरात मी १७ सप्टेंबर २००९ साली आलो.

Story img Loader