सर्वोच्च न्यायलयामध्ये सुरु असणाऱ्या सुनावणीदरम्यान शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी आपण महाविकास आघाडीचा पाठिंबा काढून घेत असल्याचं न्यायालयाने सांगितलं आहे. यामुळे आता महाविकास आघाडी सरकार अल्पमतात गेलं असून राजकीय पेच निर्माण झाला आहे. सर्वोच्च न्यायलयामध्ये या प्रकरणावर सुनावणी सुरु असतानाच केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी ट्विटरवरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे पुत्र आणि राज्यातील कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासबरोबरच शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांच्यावर खोचक शब्दांमध्ये टीका केलीय. विशेष म्हणजे काही महिन्यापूर्वी उद्धव ठाकरेंविरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे थेट अटकेपर्यंत प्रकरण गेल्याची आठवणही नारायण राणेंनी करुन दिलीय.
नक्की पाहा हा व्हिडीओ >> एकनाथ शिदेंच्या बंडासंदर्भात बोलता बोलता अजित पवारांना आठवला पहाटेचा शपथविधी; म्हणाले, “मी जेव्हा शपथ घेतली…”
नारायण राणे यांनी ट्विटरवरुन गुवहाटीमधील हॉटेलमध्ये राहत असणाऱ्या शिवसेनेच्या बंडखोर आमदारांबद्दल राऊत यांनी केलेल्या वक्तव्यावरुन शिवसेनेला लक्ष्य केलं आहे. तसेच या ट्विटमध्ये त्यांनी युवराज असा उल्लेख करत आदित्य ठाकरेंनाही टोला लगावला आहे. “शिवसेनेची सत्ता गेल्यात जमा. युवराजांनी धमक्या देणं बंद करावं. अंगावरचे मच्छर मारता येत नाहीत अशांच्या, ‘गुवाहाटीतील हॉटेलमधून बंडखोरांची प्रेतं बाहेर पडतील’, अशा वल्गनांवर कोण विश्वास ठेवेल?,” असा टोला राणेंनी लगावला आहे.
तसेच या ट्विटच्या शेवटी त्यांनी काही महिन्यांपूर्वी त्यांच्याविरोधात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन झालेल्या अटकेच्या कारवाईचा अप्रत्यक्षपणे संदर्भ देत, “अशा धमक्या देणं हा गुन्हा होत नाही का?” असाही प्रश्न विचारलाय. मुख्यमंत्र्यासंदर्भात राणेंनी केलेलं एक वक्तव्य गुन्हा असल्याचा ठपका ठेवत त्यांच्याविरोधात मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात अटकेची कारवाई करण्यात आलेली.
नक्की वाचा >> Maharashtra Political Crisis: “गुवाहाटीला जाऊन मला…”; शिवसेनेच्या बंडखोर आमदारांबद्दल बोलताना शरद पवारांचं वक्तव्य
राऊत नेमकं काय म्हणाले?
राणे यांनी आपल्या ट्विटमध्ये राऊत यांच्या वक्तव्याचा संदर्भ दिलाय. रविवारी म्हणजेच २६ जून २०२२ रोजी सकाळी शिवसेनेच्या मेळाव्यात बोलताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची जीभ घसरली. गुवाहाटीहून ४० आमदारांचे मृतदेह मुंबईत येतील व त्यांचे शवविच्छेदन होईल, असे विधान संजय राऊत यांनी केले. त्यावरून मोठा वाद सुरू झाला. त्यावर संध्याकाळी राऊत यांनी सारवासारव केली. आमदारांनी आत्मा विकल्याने जे उरले ते केवळ त्यांचे जिवंत शरीर मृतदेहासारखेच आहे. आता त्यांचे विधानभवनात विच्छेदन होईल, असा माझ्या विधानाचा अर्थ असल्याचा खुलासा राऊत यांनी केला.
नक्की वाचा >> महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींच्या केंद्रस्थानी असणाऱ्या गुवहाटीमधील ‘रेडिसन ब्लू’ हॉटेलचा मोठा निर्णय; आता…
राणेंना कशामुळे झालेली अटक?
स्वातंत्र्यदिनाच्या मुख्यमंत्र्यांच्या भाषणासंदर्भात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी वादग्रस्त शब्दात टीका केली होती. “राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मंत्रालयातील ध्वजारोहण पार पडल्यानंतर त्यांनी उपस्थितांसमोर भाषण केले. त्यावेळी त्यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. पण त्यानंतर भाषणाच्या दरम्यान मात्र त्यांचा गोंधळ उडाला”, असं राणे म्हणाले होते. हा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव की हिरकमहोत्सव? यावरून मुख्यमंत्री गोंधळलेले दिसले असं ते म्हणाले होते.
नक्की वाचा >> शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या पत्नी रश्मी ठाकरेंना फोन करुन सांगतायत…; मुंबईच्या माजी महापौरांचा मोठा दावा
“बाजूला एखादा सेक्रेटरी ठेव आणि विचारून बोल. त्या दिवशी नाही का? किती वर्षे झाली देशाला स्वातंत्र्य मिळून, अरे हिरक महोत्सव काय? मी असतो तर कानाखालीच चढवली असतं”, असं वादग्रस्त वक्तव्य केलं नारायण राणे यांनी केलं होतं. या प्रकरणामध्ये राणेंविरोधात ठाकरे सरकारने थेट अटकेची कारवाई केली होती. हे प्रकरण त्यावेळी चांगलेच तापले होते.