सर्वोच्च न्यायलयामध्ये सुरु असणाऱ्या सुनावणीदरम्यान शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी आपण महाविकास आघाडीचा पाठिंबा काढून घेत असल्याचं न्यायालयाने सांगितलं आहे. यामुळे आता महाविकास आघाडी सरकार अल्पमतात गेलं असून राजकीय पेच निर्माण झाला आहे. सर्वोच्च न्यायलयामध्ये या प्रकरणावर सुनावणी सुरु असतानाच केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी ट्विटरवरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे पुत्र आणि राज्यातील कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासबरोबरच शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांच्यावर खोचक शब्दांमध्ये टीका केलीय. विशेष म्हणजे काही महिन्यापूर्वी उद्धव ठाकरेंविरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे थेट अटकेपर्यंत प्रकरण गेल्याची आठवणही नारायण राणेंनी करुन दिलीय.
नक्की पाहा हा व्हिडीओ >> एकनाथ शिदेंच्या बंडासंदर्भात बोलता बोलता अजित पवारांना आठवला पहाटेचा शपथविधी; म्हणाले, “मी जेव्हा शपथ घेतली…”
नारायण राणे यांनी ट्विटरवरुन गुवहाटीमधील हॉटेलमध्ये राहत असणाऱ्या शिवसेनेच्या बंडखोर आमदारांबद्दल राऊत यांनी केलेल्या वक्तव्यावरुन शिवसेनेला लक्ष्य केलं आहे. तसेच या ट्विटमध्ये त्यांनी युवराज असा उल्लेख करत आदित्य ठाकरेंनाही टोला लगावला आहे. “शिवसेनेची सत्ता गेल्यात जमा. युवराजांनी धमक्या देणं बंद करावं. अंगावरचे मच्छर मारता येत नाहीत अशांच्या, ‘गुवाहाटीतील हॉटेलमधून बंडखोरांची प्रेतं बाहेर पडतील’, अशा वल्गनांवर कोण विश्वास ठेवेल?,” असा टोला राणेंनी लगावला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा