शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवसेना भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये भाजपावर जोरदार टीका केली. त्याला प्रत्युत्तर म्हणून आज भाजपा खासदार आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेला प्रत्युत्तर दिलं. संपूर्ण पत्रकार परिषदेमध्ये नारायण राणेंनी संजय राऊतांवर तोंडसुख घेतलं. यावेळी बाळासाहेब ठाकरेंची एक आठवण सांगून नारायण राणेंनी संजय राऊतांवर गंभीर शब्दांत निशाणा साधला आहे.
प्रितीश नंदींना मिळालेली खासदारकी!
यावेळी नारायण राणेंनी शिवसेनेने प्रितीश नंदींना १९९८ साली राज्यसभेची खासदारकी दिल्याची आठवण सांगितली. त्यावेळी संजय राऊतांनी कशा प्रकारे शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती, याविषयी नारायण राणेंनी सांगितलं.
“तेव्हा संजय राऊत म्हणाले होते…”
“प्रितीश नंदींना पहिल्यांदा खासदारकी मिळाली तेव्हा दिल्लीला मनोहर जोशींनी राऊतांना कमिटमेंट दिली होती की आता एक खासदारकी आली. त्यानंतर तुम्हाला देणार. पण राऊतांना न देता प्रितीश नंदीला खासदारकी दिली. तेव्हा संजय राऊत म्हणाले होते ‘मला उमेदवारी मिळाली नाही तर साहेबांचे आणि उद्धव ठाकरेंचे कपडे उतरवीन. मी यांना रस्त्यावर आणीन’. माझ्याकडे साक्षीदार आहेत. कोणत्याही क्षणी पत्रकारांसमोर आणेन. तुमची लायकी आहे का साहेबांबद्दल बोलायची?” असा सवाल नारायण राणेंनी संजय राऊतांना विचारला आहे.
“तेव्हा साहेबांनी चिडून हे काही कार्यकर्त्यांना सांगितलं. जर कदाचित साहेब हे मला बोलले असते तर आज तुम्ही नसता. साहेबांबद्दल कुणी बोललेलं मी आयुष्यात कधी ऐकून नाही घेतलं. एवढं घाणेरडं हे बोलले आहेत”, असं नारायण राणे यावेळी म्हणाले.
“संजय राऊत, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो…”
“मी त्यांना एक गोष्ट सांगतो, शिवराळ भाषा म्हणजे मर्दानी नव्हे. धमक्या देण्यासाठी त्यांनी काहीतरी करावं. भाजपाच्या दिल्लीपासून राज्यापर्यंतच्या कोणत्याही नेत्यावर टीका कराल तर त्याला उत्तर पुराव्यानिशी दिलं जाईल. तुम्हाला अभिप्रेत गोष्टी घडायला अवधी लागणार नाही”, अशा शब्दांत नारायण राणेंनी संजय राऊतांना खोचक सल्ला दिला आहे.