अलीकडे संसदेच्या पावसाळी अधिवेशनात केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार अरविंत सावंत आमने-सामने आले होते. यावरून आता खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणे यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत:ला विश्वगुरू समजतात. पण, गल्लीतल्या कारट्याला मंत्री म्हणून बसवलं आहे, असं टीकास्र विनायक राऊत यांनी नारायण राणे यांच्यावर सोडलं आहे.
विनायक राऊत म्हणाले, “मला पंतप्रधान मोदी यांचं वाईट वाटतं. पंतप्रधान मोदी स्वत:ला विश्वगुरू समजतात. पण, गल्लीतल्या कारट्याला मंत्री म्हणून बसवलं आहे. संसदेत महाराष्ट्राची इज्जत गेली आहे. लोकसभेत महाराष्ट्राचा आवाज आहे. आम्ही पाच जण, पाच पांडवांप्रमाणे आपलं अस्तित्व दाखवून देतो.”
हेही वाचा : “अजित पवार मुख्यमंत्री झाले, तर…”, बच्चू कडू यांचं मोठं विधान
“त्याच संसदेत महाराष्ट्र आणि मुळात कोकणातील एक मंत्री आहेत. त्यांना साधा अविश्वास शब्द उच्चारता येत नाही. हिंमत असेल, तर त्यांनी देवेंद्र फडणवीस हा शब्द उच्चारून दाखवावा. एक लाख रुपयांचं बक्षीस देतो,” असं आव्हान विनायक राऊत यांनी नारायण राणे यांना दिलं आहे.
हेही वाचा : VIDEO : “दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची CM च्या खुर्चीवर नजर, पण…”, देवेंद्र फडणवीसांचं विधान
“देवेंद्र फडणवीसांना एकदा म्हणालो, तुमच्या नावाचा उच्चार न करता येणाऱ्यांना तुम्ही पक्षात घेतलं आहे. तुमच्या पक्षाची फड, फड कशी होणार? त्यामुळे आमच्या पक्षप्रमुखांचा आणि नेत्यांचा आम्हाला अभिमान आहे,” असं विनायक राऊत यांनी म्हटलं.