भाजपा आमदार नितेश राणे यांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसून आदित्य ठाकरेंकडे बघत म्याव म्याव असा मांजरीचा आवाज काढल्यानंतर त्यावरून राज्यातलं राजकारण तापू लागलं आहे. विधानभवन परिसरात अशा प्रकारे आमदारांनी वर्तन करू नये, आपण कुत्री, मांजरींचं प्रतिनिधित्व करत नाही हे लक्षात ठेवावं, असा सूचक टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नितेश राणेंना लगावल्यानंतर त्यावर नितेश राणेंचं वडील आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. अजि पवारांनी आज विधानसभेत बोलताना मांडलेल्या भूमिकेवर देखील त्यांनी टीका केली आहे.

“आदित्य ठाकरे आणि मांजराचा काय संबंध?”

“विधिमंडळात नितेशनं म्याँव म्याँव केलेलं नाही. तो काही असंसदीय शब्द नाही. मग तुमची काय हरकत आहे. मांजराचा आवाज कोण काढतं की ज्यामुळे संताप झाला? आदित्य ठाकरेंचा आणि मांजराचा संबंध आहे का? वाघाची मांजर कधी झाली? त्याच वेळी कुणी अजून कसला आवाज काढला असता, तर ते तसेच आहेत का? मांजरीचा आवाज काढला म्हणून राग का यावा?” असा सवाल नारायण राणेंनी कणकवलीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.

“मी अन्याय सहन करणाऱ्यातला नाही. विधिमंडळात सगळ्याच चांगलं काम नितेश राणे करतो आहे”, असं कोतुक देखील नारायण राणेंनी केलं.

“मला समाधान आहे की किमान उपमुख्यमंत्र्यांना याची जाणीव आहे”, १२ आमदारांच्या निलंबन प्रश्नी फडणवीसांचा टोला!

अजित पवारांना प्रतिप्रश्न

दरम्यान, यावेळी पत्रकारांनी अजित पवारांनी विधानसभेत मांडलेल्या भूमिकेविषयी विचारणा केली असता नारायण राणेंनी त्यावर निशाणा साधला. “कोण अजित पवार? मी ओळखत नाही अजित पवारांना. राज्यातल्या लोकांच्या कोट्यावधी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप आहे, त्यांच्याबाबत संदर्भ का देत नाहीत तुम्ही?” असा उलट प्रश्न त्यांनी अजित पवारांना केला.

नितेश राणे यांना अटक होणार? आज कोर्टात सुनावणी, दोन्ही बाजूंनी वकिलांची फौज; नारायण राणे दौरा सोडून कणकवलीत

काय म्हणाले अजित पवार?

“संससदीय सभ्याचार आणि शिष्टाचार हे पुस्तक सर्वांना वाचले पाहिजे. या सभागृहामध्ये निवडूण येताना लाखों मतदार तुमच्याकडे बघून मतदार करतात त्यातून तुम्ही या सभागृहाचे प्रतिनिधित्व करता. कुत्री, मांजरं, कोंबड्यांचं आपण प्रतिनिधित्व करत नाही याची जाणीव ठेवली पाहिजे”, असं अजित पवार आज विधानसभेत बोलताना म्हणाले आहेत.

“उजव्या बाजूला खरचटल्यामुळे ३०७ लागते हे मी पहिल्यांदाच पाहिलं. ब्रेन, हार्ट अशा ठिकाणी मारल्यानंतर मृत्यू होतो. अशी काही मारहाण झाली, तर तिथे ३०७ लागते. पोलीस हॉस्पिटलला गेले. तिथे रुग्ण असतात. तिथे माझी पत्नीही बसली होती. हे उघडून द्या, दे उघडून द्या.. ही काय भाषा आहे पोलिसांची? कुणाचं हॉस्पिटल आहे? कुणाच्या पत्नीसोबत तुम्ही बोलताय?”, असा प्रश्नही त्यांनी केला.

Story img Loader