भारतीय जनता पार्टीचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीला गेले आहेत. राज ठाकरे यांचं निवासस्थान ‘शिवतीर्थ’ येथे जाऊन राणेंनी भेट घेतली. नारायण राणे असं अचानक राज ठाकरेंच्या भेटीला गेल्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. दोन्ही नेत्यांनी नेमक्या कोणत्या कारणासाठी भेट घेतली? हे अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही. पण आगामी मुंबई महापालिका निवडणुका आणि राज्यातील इतर काही निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याची माहिती मिळत आहे. या भेटीबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

खरं तर, अलीकडेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कोकण दौरा केला होता. या दौऱ्यादरम्यान राज ठाकरेंनी नारायण राणेंच्या घरी सदिच्छा भेट दिली होती. पण त्यावेळी नारायण राणे घरी नव्हते. त्यामुळे या दोन्ही नेत्यांची भेट होऊ शकली नाही.

हेही वाचा- “अनिल देशमुख, संजय राऊत यांच्या सुटकेवरुन आता तरी धडा घ्या”, सत्तेच्या गैरवापराबाबत शरद पवारांचं मोठं विधान

यानंतर आज नारायण राणे यांनी राज ठाकरेंचं निवासस्थान शिवतीर्थावर जाऊन राज ठाकरेंची भेट घेतली. दोन्ही नेत्यांनी अचानक भेट घेतल्याने राजकीय वर्तुळांत चर्चांना उधाण आलं. नारायण राणे सपत्नीक भेट घेतल्याची माहिती समजत आहे.