केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी काल महाड येथील पत्रकारपरिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना, केलेल्या गंभीर वक्तव्याने राज्यात खळबळ उडाली आहे. शिवाय, राज्यातील राजकीय वातावरण देखील कमालीचं तापलं आहे. शिवसेनेने राणेंच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत, राज्यभर आंदोलनं सुरू केली. तर भाजपा कार्यकर्ते देखील रस्त्यावर उतरल्याने मोठा वाद निर्माण झाल्याचे दिसून आले. दरम्यान, नारायण राणेंचा अटकपूर्वी जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळल्यानंतर त्यांना रत्नागिरी पोलिसांनी अटक केली आहे. या पार्श्वभूमीवर विविध राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत, शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी देखील नारायण राणेंवर पुन्हा एकदा गंभीर टीका केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

गुलाबराव पाटील म्हणाले, ”यात्रा काढणं हा त्यांचा अधिकार होता, यात्रा काढण्याबद्दल कुणाचंही दुमत नव्हतं. यापूर्वी देखील प्रत्येक पक्षाने आपल्या परीने यात्रा काढलेल्या आहेत. पण त्यांनी जे वक्तव्यं केलं होतं की ते कोणत्याही लोकशाहीमध्ये झालेल्या घटनेत सगळ्यात वाईट घटना त्यांनी त्या दिवशी केली. यापूर्वी जर आपण यशवंतराव चव्हाणांपासून शरद पवार, देवेंद्र फडणवीसांपर्यंत इतर आदर्श नेत्यांची नावं आपण पाहिली, तर कोणत्याही नेत्याने अशा पद्धतीचं वक्तव्य केलं नव्हतं. अशाप्रकारचं वक्तव्यं नारायण राणे सारख्या माजी मुख्यमंत्र्यांनी केलं. मला तर असं वाटतं की… मी कालही बोललो आणि आजही सांगतोय, त्यांचं डोक्याचं संतुलन बिघडलं आहे. त्यांना ठाण्याला पाठवलं पाहिजे शॉक दिले पाहिजे आणि योग्य पद्धतीने त्यांची तपासणी करून, त्यांना पक्षाच्या कामासाठी आजची जी रथयात्रा जी सुरू झाली आहे, त्या यात्रेला थांबवून पुन्हा ती सुरू करण्यासाठी मला तरी वाटतं की, त्यांची चाचणी व्हावी. आज त्यांना अटक झाली हे चागंलं काम झालं. त्यामुळे कोणीही मुख्यमंत्री कुठल्याही पक्षाचा जर असेल, तरी तो मुख्यमंत्री हा कोणत्याच पक्षाचा नसतो तो १२ कोटी जनतेचा मुख्यमंत्री आहे. त्या पदाचा मान राखण्यासाठी पोलीस यंत्रणेने केलेली कारवाई योग्य आहे, असं मला वाटतं.”

“… त्यामुळे नारायण राणेंचं डोकंही सूक्ष्म झालेलं आहे”; गुलाबराव पाटलांची गंभीर टीका!

या अगोदरही गुलाबराव पाटील यांनी काल राणेंवर टीका केली होती.  “नारायण राणे किती दिवस अस्वस्थ होते हे आपण पाहिलेलं आहे. त्यांचा अस्वस्थपणा आता मंत्रिपद मिळाल्याने बाहेर निघालेला आहे. पूर्वी ते शिवसेनेत अस्वस्थ होते, नंतर काँग्रेसमध्ये गेले तिथे अस्वस्थ झाले. आता त्यांना सूक्ष्म, लघु खातं मिळालेलं आहे, त्यामुळे त्याचं डोकंही सूक्ष्म झालेलं आहे.” अशा शब्दांमध्ये गुलाबराव पाटील यांनी माध्यमांशी बोलाताना केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्यावर  निशाणा साधला होता.