Narendra Modi apology over Chhatrapati Shivaji Maharaj Statue collapsed Jayant Patil Reacts : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या घटनेवरून विरोधक राज्य सरकारवर टीका करत असतानाच घटनेच्या चार दिवसांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याप्रकरणी जाहीर माफी मागितली आहे. मोदी आज (३० ऑगस्ट) महाराष्ट्र दौऱ्यावर असून त्यांनी दुपारी पालघर येथील वाढवण बंदराचे भूमिपूजन केले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी सिंधुदुर्ग येथील घटनेवर प्रतिक्रिया दिली. तसेच घडलेल्या दुर्घटनेबद्दल सर्व शिवभक्तांची माफी देखील मागितली.

नरेंद्र मोदी (Narendra Modi) म्हणाले, “काही दिवसांपूर्वी सिंधुदुर्गमध्ये जे काही घडलं, ते अत्यंत दुख:द आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त नाव नाही, तर ते आमचे आराध्य दैवत आहेत. मी आज नतमस्तक होऊन त्यांची माफी मागतो. तसेच जे लोक छत्रपती शिवाजी महाराजांना आराध्य मानतात, या घटनेमुळे त्यांच्याही मनाला वेदना झाल्या आहेत. मी त्या शिवप्रेमींपुढे नतमस्तक होऊन त्यांची देखील माफी मागतो”.

Ajit Pawar meeting in Katol assembly constituency on 31st August
Maharashtra News : मालवणमधील नव्या पुतळ्याचं काम राम सुतार यांच्याकडे; अजित पवारांची माहिती
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
Nana Patole rno
Nana Patole : “मोदींनी चूक मान्य केली, आता शिंदे-फडणवीसांनी…”, नाना पटोलेंचा चिमटा; म्हणाले, “पेशव्यांनी महाराष्ट्राचा…”
LokPoll Survey Results in Maharashtra
LokPoll Survey: महाराष्ट्रात लोकसभेची पुनरावृत्ती होणार; मविआला १४१ ते १५४ जागा, तर महायुतीला…
Hasan Mushrif on Sharad pawar
Hasan Mushrif on Sharad Pawar: “पवार साहेब तुमच्याशी वैर नाही, समरजित आता तुझी…”, हसन मुश्रीफांचे प्रत्युत्तर
Who is Jaydeep Apte in Marathi
Jaydeep Apte : जयदीप आपटेला पोलिसांनी हाक मारली, रडत गयावया करु लागला आणि म्हणाला; “मला…”
Narendra modi on Surat Loot
Surat Loot : सूरतेची महाराजांची लूट आणि मोदींचे १० वर्षांपूर्वीचे उद्गार… नक्की ऐका
Kirit Somaiya
Kirit Somaiya : “मला न विचारताच घोषणा”, किरीट सोमय्यांनी भाजपाचा आदेश धुडकावला; म्हणाले, “पुन्हा अशी वागणूक…”

हे ही वाचा >> पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मागितली जाहीर माफी, शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी खेद व्यक्त करताना म्हणाले…

भ्रष्टाचार आणि निष्काळजीपणाला माफी मिळणार नाही : जयंत पाटील

दरम्यान, मोदींच्या (Narendra Modi) माफीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व आमदार जयंत पाटील यांनी आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. पाटील म्हणाले, “भ्रष्टाचार आणि निष्काळजीपणाला माफी मिळणार नाही. प्रायश्चित्त अटळ आहे. पाटील यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की भ्रष्टाचार आणि निष्काळजीपणाला छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीच माफी दिली नव्हती. आमचा महाराष्ट्र हा शिवाजी महाराज यांनी दाखवलेल्या वाटेवर चालतो. त्यामुळे साहेब, महाराष्ट्र या चुकीला माफी देऊ शकणार नाही. प्रायश्चित्त अटळ आहे. जय शिवराय!”

हेही वाचा – PM Narendra Modi Live: वाढवण बंदराचे काम विरोधकांनी मुद्दामहून रोखून ठेवले, पंतप्रधान मोदींचा आरोप

विरोधकांच्या टीकेला मोदींचं प्रत्युत्तर

दरम्यान, मोदी यांनी यावेळी विरोधकांच्या टीकेलाही जोरदार प्रत्युत्तर दिलं. ते म्हणाले, “आमचे संस्कार वेगळे आहेत. त्या लोकांसारखे नाहीत, जे महाराष्ट्राचे सुपूत्र असलेल्या वीर सावरकरांना शिव्या देतात. विरोधकांनी अनेकदा सावरकरांना अपमानित केलं आहे. तसेच देशभक्तीची भावना पायदळी तुडवली आहे. मात्र, या लोकांनी कधीच वीर सावरकरांची माफी मागितली नाही, विरोधकांचे संस्कार आता महाराष्ट्रातल्या जनतेला माहिती झाले आहेत. मी माफी मागितली आहे. कारण हेच आमचे संस्कार आहेत”.