राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जीएसटीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी जीएसटी संदर्भात राज्याच्या मुख्यमंत्र्याची बैठक बोलवली होती. त्या बैठकीत जीएसटीवर सर्वात जास्त विरोध तत्कालीन गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी केला होता. तेव्हा त्यांचं धोरण वेगळं होते. मात्र, आज जीएसटीच्या माध्यमातून अधिक उत्पादन मार्ग तयार करणे, हे त्याचं लक्ष आहे. त्याचा परिणाम व्यवसायांवर होत आहे, अशा शब्दांत पवारांनी मोदींची कानघडणी केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बारामती मर्चंट्स असोसिएशनच्या कार्यक्रमाला प्रकृती ठीक नसतानाही शरद पवार उपस्थित होते. तेव्हा ते बोलत होते. “कर उत्पादन किती असावे, यालाही काही मर्यादा असते. केंद्र सरकारने सोन्यावर ३८ टक्के तर, मोटार खरेदीवर ४० टक्के कर लावला आहे. महाराष्ट्र ऑटोमोबाईल क्षेत्रात देशातील महत्वाचं राज्य आहे. रांजणगाव आणि चाकणमध्ये अनेक ऑटोमोबाईल कंपन्यांनी आपला व्यवसाय थाटलेला आहे. यामुळे स्थानिक मुलांना नोकरी आणि छोट्या मोठ्या उद्योगांना फायदा होतो,” असेही शरद पवारांनी म्हटलं.

हेही वाचा : ‘खोक्याचे पुरावे द्या, अन्यथा नोटीस पाठवणार’ म्हणणाऱ्या बच्चू कडूंना रवी राणांचे प्रत्युत्तर; म्हणाले, “कोणी कितीही…”

साखर कारखानदारीवर बोलताना शरद पवार म्हणाले, “यापूर्वी उस गाळल्यानंतर साखर करत होतो. मात्र, आता आपण पुढे गेलो असून, ऊसापासून साखर, वीज आणि इथोनॉल हे नवीन उत्पन्नाच साधन हाती आलं आहे. त्यात महाराष्ट्र देशात अग्रस्थानी आहे. एकेकाळी यामध्ये उत्तरप्रदेश क्रमांक एकवर होता. पण, आज महाराष्ट्र एक क्रमांकावर गेला आहे, त्याचं कारण साखर, इथेनॉल आणि वीज या तिन्ही गोष्टी करायला लागल्याने आर्थिक ताकद वाढली,” असेही शरद पवारांनी स्पष्ट केलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Narendra modi oppossed manmohan singh gst meeting say sharad pawar ssa