Narendra Modi Badlapur Assualt Case : कोलकाता येथील आर. जी. कार वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील प्रशिक्षणार्थी डॉक्टर तरुणीवर बलात्कार करून तिचा खून करण्यात आल्याचं प्रकरण दोन आठवड्यापूर्वी समोर आलं होतं. या घटनेनंतर देशभरातून संतापाची लाट उसळली आहे. पाठोपाठ महाराष्ट्राच्या ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील एका शाळेत काम करणाऱ्या सफाई कामगाराने दोन चिमुकल्या मुलींवर (चार वर्षे व सहा वर्षे) लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात शाळेने व पोलिसांनी कारवाई करण्यास दिरंगाई केल्याची बाब देखील समोर आली आहे. यासह आसाम, दिल्ली व देशाच्या विविध भागांमधून महिलांवरील अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत. दरम्यान, महाराष्ट्र दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बदलापूर प्रकरणावर बोलावं, देशभरातील महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांवर बोलावं, अशी मागणी विरोधी पक्ष करत आहेत.

बदलापूरमधील घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडी राज्यभर निदर्शने करत आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील व देशातील महिलांवरील अत्याचाराच्या घटनांकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं लक्ष वेधूण्यासाठी, यावर मोदींनी भाष्य करावं या मागणीसाठी महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीने आज सकाळी छत्रपती संभाजीनगर विमानतळाबाहेर आंदोलन केलं. मोदी या विमानतळावरून उतरून जळगावला जाणार असल्याने मविआ कार्यकर्त्यांनी काळे कपडे परिधान करून व हातात पोस्टर्स घेऊन विमानतळाबाहेर साखळी आंदोलन केलं. मात्र पोलिसांनी दानवेंसह मविआच्या असंख्य कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन हे आंदोलन मोडून काढलं.

Amit Shah Malkapur, Chainsukh sancheti campaign,
मविआ म्हणजे विकास विरोधी आघाडी, गृहमंत्री अमित शहांचे टीकास्त्र; लाडक्या बहिणींना २१०० रुपये देणार
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
Devendra Fadnavis Dharni, Chikhaldara Skywalk Work,
‘चिखलदरा स्‍कायवॉकचे काम महाविकास आघाडीने थांबविले’, उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणीसांचा आरोप
Chief Minister of Telangana, Himachal and Deputy Chief Minister of Karnataka reply to BJP on the scheme Print politics
गरिबांचे पैसे गरिबांना ही काँग्रेसची हमी; तेलंगणा, हिमाचलचे मुख्यमंत्री तर कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांचे भाजपला प्रत्युत्तर
Rs 700 crore was recovered from liquor sellers pm Narendra Modi alleged
“काँग्रेसच्या सत्तेतील राज्य शाही परिवाराचे ‘एटीएम’, मद्यविक्रेत्यांकडून ७०० कोटी रुपयांची वसुली,” पंतप्रधान नरेंद्र मोदींचा घणाघात
Devendra Fadnavis applauded by Narendra Modi Amit Shah print politics news
मोदी, शहांकडून फडणवीस यांच्यावर कौतुकाची थाप! मुख्यमंत्री पदाचे संकेत
Assembly Elections 2024 Akkalkuwa-Akrani Assembly Constituency Congress
लक्षवेधी लढत: अक्कलकुवा: लोकसभेतील पराभवाचे उट्टे काढणार का?
Devendra Fadnavis , Ravi Rana, Mahavikas Aghadi,
विरोधकांच्या डोक्‍याचे नट कसण्‍यासाठी मी राणांचा पाना… फडणवीसांकडून जोरदार….

हे ही वाचा >> PM Narendra Modi Jalgaon: महाराष्ट्राच्या संस्काराचा जगभरात प्रसार; लखपती दीदी कार्यक्रमात मोदींनी केला पोलंडच्या कोल्हापूर स्मारकाचा उल्लेख

गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हायला हवी : मोदी

दुसऱ्या बाजूला, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांवरील अत्याचारांच्या घटनांवर जळावातील कार्क्रमात परखड भाष्य केलं आहे. मोदी जळगावातील सभेत म्हणाले, पोलीस दल, निमलष्करी दलांमध्ये महिलांची संख्या वाढत आहे. गावागावात कृषी क्षेत्र, दुग्ध व्यवसाय, स्टार्टअपपासून ते मोठ्या व्यवसायांमध्ये महिला दिसत आहेत. मुली स्टार्टअप व मोठे व्यवसाय देखील सांभाळू लागल्या आहेत. राजकारणात त्यांची भागीदारी वाढावी यासाठी आम्ही ‘नारीशक्ती वंदन कायदा’ बनवला आहे. आपल्या माता, बहिणी व मुलींचं सामर्थ्य वाढवण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. त्याचबरोबर त्यांची सुरक्षा ही देखील आपल्या देशाची प्राथमिकता आहे. मी लाल किल्ल्यावरून अनेकदा हा मुद्दा उपस्थित केला आहे. सध्या घडलेल्या घटना पाहता महिलांचा राग मी समजू शकतो. त्यामुळे मी सर्वच पक्षांना सांगतो, राज्य सरकारला सांगतो की महिलांविरोधात अपराध म्हणजे अक्षम्य पाप आहे. यामधील गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हायला हवी. तसेच कोणी त्यांचा बचाव करत असेल, त्यांना मदत करत असले तर त्यांनाही शासन व्हायला पाहिजे.