वाई : आतापर्यंत अदानी आणि अंबानी यांची नावे कोणाबरोबर जोडली होती. ते कोणाचे दोस्त आहेत अशी चर्चा सगळीकडे होत असताना त्याची चर्चा पुन्हा पुन्हा होऊ नये व त्याचा परिणाम त्यांच्या पक्षावर होऊ नये, यापासून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी मोदीं असे बोलत असतात असे शरद पवार यांनी सातारा येथे सांगितले. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित कार्यक्रमासाठी पवार साताऱ्यात आले आहेत यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अदानी आणि अंबानी यांनी काँग्रेसला पैसे दिले अशा पद्धतीची चर्चा मोदींनी केल्याबाबत पवारांना यांना विचारले असता त्यांनी सांगितले की आतापर्यंत अदानी आणि अंबानी यांचे संबंध कोणाबरोबर जोडले आहेत. ते कोणाचे दोस्त आहेत. याबद्दल कोणाची चर्चा सुरू आहे. याचा परिणाम पक्षाच्या मतदानावर होऊ नये यासाठी ते दुसऱ्या पक्षांची नावे घेऊन दुसरीकडे वळवत असल्याचे पवार म्हणाले.

आणखी वाचा-‘छगन भुजबळांकडून तुतारीचा प्रचार’, शिंदे गटाच्या आमदाराकडून गंभीर आरोप, राजीनाम्याची केली मागणी

पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान हे मोदींना अस्वस्थ करणार आहे असं दिसतं आहे. पहिल्या दुसरा तिसरा टप्पा झाल्यानंतर मोदींनी आपली भाषा बदलली आहे. त्यांनी मुस्लिम समाजाचा उल्लेख खुल्या (ओपनली) पद्धतीने प्रथमच केला. त्यामुळे त्यांना आता धर्मांध आधाराशिवाय बदल होणार नाही अशी शंका त्यांच्या मनात येऊ लागली आहे. जसे जसे पुढे जातील तसे मोदींचे स्थान जास्तीत जास्त संकटात जात असल्याची भावना त्यांच्या पक्षाच्या सहकाऱ्यांमध्ये येत असावी असं माझं परीक्षण असल्याचे ते म्हणाले .

राज्यात विरोधकांना ३० ते ३५ जागा मिळतील

महाराष्ट्र मध्ये यावेळी विरोधी आघाडीला ३० ते ३५ जागा मिळतील असे भाकीत त्यांनी केले. मागील वेळी विरोधकांना सहा जागा मिळाल्या होत्या. मात्र यावेळी लोकांना बदल हवा आहे. त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला लोकांचे समर्थन मिळत आहे असं एक महाराष्ट्राचे चित्र आहे. राज ठाकरे आणि आणि पंतप्रधान मोदी मुंबईमध्ये एकत्र येत आहेत याचा अर्थ मोदींचा आत्मविश्वास डळमळीत व्हायला लागला आहे. त्यामुळे त्यांना मुंबईमध्ये नेहमी कोणाची ना कोणाची तरी मदत घ्यावीच लागते आणि त्यासाठी ते दोघे एकत्र आले आहेत. त्याचा परिणाम काय होतोय हे लवकरच दिसून येईल.

आणखी वाचा-‘शरद पवारांचा पराभव हवा’, चंद्रकांत पाटील यांच्या विधानावर अजित पवारांची टीका; म्हणाले, “त्यांनी बारामतीत..”

राष्ट्रवादी काँग्रेस विलीन करण्याबाबत बोललो नाही, शिवसेना विलीन करायचा प्रश्नच नाही

जे पक्ष काँग्रेस च्या नेहरू गांधींच्या विचाराचे आहेत व अनेक वर्ष त्यांनी एकत्र त्या विचाराने काम केलं आहे ते पक्ष एकत्र येतील असे मी म्हणालो आहे. याचा अर्थ राष्ट्रवादी काँग्रेस विलीन होईल असं नाही आणि शिवसेनेचे स्वतंत्र अस्तित्व आहे ते फक्त या निवडणुकीमध्ये आम्हाला मदत करत आहेत. त्यामुळे त्यांचe पक्ष विलीन होईल असं मी कधी म्हणालो नाही.

गुजरातसह भाजपची सत्ता असणाऱ्या अनेक राज्यांमध्ये मतदान केंद्र बळकवण्याची प्रवृत्ती वाढत आहे. पक्षामध्ये तुम्ही स्वतः निर्णय घेता आणि पक्षाने निर्णय घेतला असल्याचे असल्याबाबत अजित पवार महाराजांचे विचारले असता ते म्हणाले आता ते स्वतःचा पक्ष चालवत आहेत ना मग त्यांनाच विचारा पक्ष कसा चालवतात ते असे ते म्हणाले. मी पक्षात ज्येष्ठ असतो तरी या वयात मला कोणीही पळापळ करायला सांगत नाही सगळे माझी काळजी घेतात असे त्यांनी अजित पवारांच्या काळजीवर मत व्यक्त केले.

सुप्रिया सुळे विजयी होण्याची कार्यकर्त्यांना खात्री असेल

सुप्रिया सुळे पुण्यात आल्यानंतर कार्यकर्त्यांनी पेढे वाटून फटाक्याची आतष बाजी करत जल्लोष केला. व त्या निवडणुकीत विजयी होणार असल्याच्या घोषणा दिल्या. याबाबत ते म्हणाले कार्यकर्त्यांना त्याची खात्री वाटत असेल म्हणून त्यांनी आनंद व्यक्त केला असेल.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Narendra modi trying to divert attention from adani and ambani friendship says sharad pawar mrj