लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रात एनडीचं सरकार स्थापन झालं आहे. ९ जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचे पंतप्रधान म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेतली. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला बहुमताचा आकडा गाठता आला नाही. मात्र, एनडीए आघाडीच्या माध्यमातून देशात एनडीएचं सरकार सत्तेत आलं. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत काँग्रेसचे माजी खासदार कुमार केतकर यांनी मोठा दावा केला आहे. “२०२७ ला एनडीएचे राष्ट्रपती पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी असतील”, असा दावा कुमार केतकर यांनी केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांच्या ‘संसदेत गर्जतो शिवनेरीचा छावा’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याच्या कार्यक्रमात काँग्रेसचे माजी खासदार कुमार केतकर बोलत होते. यावेळी कुमार केतकर यांनी हा दावा केला. तसेच कुमार केतकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला.

हेही वाचा : लालूप्रसाद यादव यांचा मोठा दावा, “ऑगस्ट महिन्यात केंद्रातलं मोदी सरकार कोसळणार, कारण..”

कुमार केतकर काय म्हणाले?

“देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा राष्ट्रपती पदाचा कार्यकाळ २०२७ ला संपेल. मला असं वाटतं त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी असं म्हणतील की आता मी राष्ट्रपती होतो. माझी राष्ट्रपती पदासाठी उमेदवारी आहे. मग जर खरोखर ते थोड्याशा मताने निवडून आले आणि राष्ट्रपती झाले. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत मत मोजण्याची पद्धत वेगळी असते. त्यामुळे थोड्याशा मताने समजा ते निवडून आले आणि २०२७ ला नरेंद्र मोदी राष्ट्रपती झाले. त्यानंतर ते २०३२ पर्यंत राष्ट्रपती असतील. मग २०२९ च्या लोकसभा निवडणुकीत दिल्लीत अगदी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गटाची जरी सत्ता आली तरी नरेंद्र मोदी राष्ट्रपती असतील. त्यामुळे ते काहीही करु शकणार नाहीत. कारण नरेंद्र मोदी राष्ट्रपती असतील. राष्ट्रपती प्रत्येक गोष्ट तुम्हाला आडऊ शकतात”, असं माजी खासदार कुमार केतकर यांनी म्हटलं आहे.

मोदींना हिंदु राष्ट्रात रस नाही

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोनच इच्छा आहेत. अगदी प्रामाणिकपणे सांगायचं झाल्यास नरेंद्र मोदी यांना हिंदु राष्ट्रामध्ये फारसा रस नाही. हिंदु राष्ट्र हवा आहे, पण हिंदु राष्ट्राची नैपत्य रचना करायची. मात्र, नरेंद्र मोदींचा जीव हा फक्त सत्तेमध्ये अडकलेला आहे. ते सत्तेत राहण्यासाठी ते जे शक्य असेल ते करतात. मग राजकीय पक्ष फोडण्यापासून सर्वच”, अशी टीका माजी खासदार कुमार केतकर यांनी केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Narendra modi will be the presidential candidate in 2027 says former congress mp kumar ketkar gkt
Show comments