सोलापूर : महाराष्ट्राच्या प्रगतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे योगदान खूप मोठे आहे. त्यांच्या शब्दपूर्तीच्या कार्यातून ‘मोदी हमी’ बनली आहे. आगामी काळात तिसऱ्यांदा मोदी हेच देशाचे पंतप्रधान बनणार आणि महाराष्ट्रातही महायुतीची सत्ता कायम राहणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सोलापुरात रे नगर योजनेतून पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते कामगारांना घरांचा ताबा देताना मुख्यमंत्री शिंदे उपस्थित होते. त्या वेळी बोलताना त्यांनी पंतप्रधानांवर स्तुतिसुमने उधळली. ‘मोदी गॅरंटी’ केवळ कागदावर किंवा शब्दावर नाही तर ते वास्तव आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली विकसित भारताच्या संकल्पनेत योगदान देण्याचे भाग्य आपणास मिळाले, याचा शिंदे यांनी अभिमानाने उल्लेख केला. दावोस येथे झालेल्या परिषदेत महाराष्ट्रात तीन लाख ५३ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होत असून, त्यांपैकी काही उद्योग कंपन्यांचे करार होत आहेत. मात्र, दावोसमध्ये जगभरातील अनेक बलाढय नेत्यांच्या तोंडी नरेंद्र मोदी यांचे कौतुक ऐकायला मिळाले. त्याचा सार्थ अभिमान वाटतो, असे शिंदे यांनी नमूद केले.

मोदी यांनी दिलेले प्रत्येक आश्वासन यशस्वीपणे पूर्ण केले आहे. समृद्धी महामार्ग, अटल सेतू, मेट्रो प्रकल्प, गरिबांना घरे अशा असंख्य योजनांचे भूमिपूजन मोदी यांनी केले आणि या सर्व योजना मार्गी लागल्यानंतर त्याचे लोकार्पणही मोदी यांनीच केले. असे भाग्य खूप कमी नेत्यांना मिळते, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी कौतुकाचा वर्षांव केला.

हेही वाचा >>> शेतकऱ्यांविषयी मोदी सरकारला आस्था नाही; शरद पवार यांची टीका

रामज्योत प्रज्वलित करण्याचे आवाहन

पंतप्रधान मोदी यांनी अयोध्येत येत्या २२ जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा होणाऱ्या श्रीरामलल्ला मंदिराचा उल्लेख करून त्या दिवशी सायंकाळी प्रत्येकाने आपापल्या घरात रामज्योत प्रज्वलित करण्याचे आवाहन केले. यासाठी संकेत रूपाने होकार देण्यासाठी या वेळी उपस्थित समुदायाला आपापल्या मोबाइलचे दिवे प्रज्वलित करण्याचे आवाहन मोदी यांनी करताच संपूर्ण सभास्थळ मोबाइलच्या प्रकाशझोतात झळाळून गेले. त्या वेळी जय श्रीरामच्या घोषणांसह मोदी-मोदीच्या ललकारीने संपूर्ण सभास्थळ दुमदुमून गेले. श्रीरामज्योतीच्या रूपाने गरिबांच्या घरातील अंधार संपविण्याची प्रेरणा मिळून त्यांचे आयुष्य प्रकाशमान व्हावे, अशा शब्दांत मोदी यांनी सदिच्छा व्यक्त केली.

पद्मशाली समाज, सोलापुरी चादर अन् जाकीट

सोलापूर कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणामध्ये येथील पद्मशाली समाज, सोलापुरी चादर अन् जाकीट अशा अनेक गोष्टींसह पंढरपूरचा विठ्ठल आणि सोलापूरच्या सिद्धेश्वर देवतांचा उल्लेख करत आपले या भागाशी असलेले ऋणानुबंध प्रकट करत सोलापूरकरांचे मन जिंकले. सोलापूरशी आपला निकटचा संबंध असल्याचे सांगताना पंतप्रधान म्हणाले, की सोलापूरशी संबंधित पद्मशाली समाज आमच्या अहमदाबादेतही राहतो. सोलापुरातून आलेले याच समाजाचे दत्ताजी चिरंदास यांच्याशी मनमोकळया गप्पागोष्टी व्हायच्या. सोलापुरी चादरीसह आपणास भेट म्हणून सोलापुरातून वेळोवेळी पाठविण्यात आलेल्या जाकिटासह आपली प्रतिमा चितारलेल्या कलात्मक ‘वॉल हँगिग’चाही मोदी यांनी आवर्जून उल्लेख केला. भाषणात अधूनमधून मराठी वाक्यांचा उच्चार करीत त्यांनी सोलापूरकरांचे मन जिंकले.