पाच महिन्यांपूर्वी महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाला आणि त्यात झालेल्या राजकीय पडझडीत एक नाव सातत्याने चर्चेत राहिले, ते म्हणजे आसाममधील गुवाहाटी होय. मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे व त्यांच्या गटातील मंत्री आणि आमदार पुन्हा गुवाहाटीला जाणार आहेत. ही गुवाहाटीवारी आसाममधील प्रसिद्ध कामाख्या देवीचे दर्शन घेण्यासाठी आहे. यावरून शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर टीका केली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिंदे गटावर हल्लाबोल करताना संजय राऊत म्हणाले की, “५० रेडे परत गुवाहाटीला चालले आहेत. जाऊन दर्शन घेऊन या. पण, सुदर्शन चक्र आमच्याकडे आहे. उद्धव ठाकरेंच्या हातात हे सुदर्शन चक्र फिरत आहे. त्याने या ५० रेड्यांचा राजकीय दृष्ट्या नायनाट झाल्याशिवाय राहणार नाही,” अशा शब्दांचा संजय राऊतांनी समाचार घेतला होता.

हेही वाचा : “अनायसे फोन आलाच होता तर…” ; चित्रा वाघ यांनी संजय राऊतांना लगावला टोला!

याला आता शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश मस्के यांनी संजय राऊतांना प्रत्युत्तर दिलं आहे. “आवाजही न फुटणाऱ्या बावळट पेंग्विनपेक्षा रेडे परवडले. रेड्यांनी शिंगे उगारली की बिळात जाऊन लपू नका. लहान मुले खेळण्यातील सुदर्शन चक्र फिरवतात, तसेच त्यांच्या हातात आहे. एक फुंकर मारली की ते उडून जाईल,” असा टोलाही नरेश मस्के यांनी लगावला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Naresh maske reply sanjay raut and aaditya thackeray say penguin ssa
Show comments