Narhari Zirwal On Chhagan Bhujbal : विधानसभेच्या निवडणुकीनंतर राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं. त्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार देखील पार पडला. यामध्ये भारतीय जनता पक्ष, शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या काही आमदारांनी मंत्रि‍पदाची शपथ घेतली. मात्र, मंत्रिमंडळाच्या विस्तरात अनेक दिग्गज नेत्यांना डावलण्यात आलं. त्यामुळे महायुतीमधील काही नेते नाराज झाल्याची चर्चा आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते छगन भुजबळ यांना देखील मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही. तसेच मंत्रिमंडळात संधी न मिळाल्यामुळे छगन भुजबळ यांनी आपली नाराजी जाहीर बोलून दाखवली. एवढंच नाही तर आता आपली पुढची भूमिका कार्यकर्त्यांशी बोलून घेणार असल्याचं विधानही त्यांनी केली.

दुसरीकडे छगन भुजबळ यांची नाराजी दूर केली जाईल असं राष्ट्रवादीच्या काही नेत्यांकडून सांगितलं जात आहे. मात्र, या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. या सर्व घडामोडींवर आता राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते नरहरी झिरवळ यांनी सूचक विधान केलं आहे. ‘छगन भुजबळ यांना आता तरी थांबवलं असेल. पण कदाचित पुढे अजून मोठा काही विचार होणार असेल’, असं नरहरी झिरवळ यांनी एबीपी माझा या वृत्तवाहीनीशी बोलताना म्हटलं आहे. त्यांच्या या विधानाचा नेमकं अर्थ काय? याबाबत आता तर्कवितर्क लावले जात आहेत.

mla sanjay rathod upset over baseless news spread against him by media
“मन दुखावले, जिव्हारी लागले…” आमदार संजय राठोड असे का म्हणाले?
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
When Devendra Fadnavis becomes Chief Minister conspiracy is hatched to create communal tension says Amar Sable
“देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतात तेव्हा जातीय तणाव निर्माण करण्याचं षड्यंत्र…”- अमर साबळे
Sadabhau Khot
“राहुल गांधींचं एकच स्वप्न, मेरी शादी कब होगी?” मारकडवाडीतून सदाभाऊ खोतांचा चिमटा; ‘खळं लुटणारा’ म्हणत पवारांवर टीका
Sudhir Mungantiwar On Karnataka
Sudhir Mungantiwar : “कर्नाटक सरकारला याचा हिशेब द्यावा लागेल”; सुधीर मुनगंटीवार यांचा इशारा, कारण काय?
Nana Patole Speech About Rahul Narwekar ?
Nana Patole : नाना पटोलेंचं वक्तव्य; “राहुल नार्वेकर यांचं अभिनंदन, मात्र २०८ मतांनी मी निवडून आलो म्हणून टिंगल..”
What Devendra Fadnavis Said About Rahul Narwekar ?
Devendra Fadnavis : “राहुल नार्वेकर पुन्हा येईन म्हणाले नव्हते तरीही पुन्हा आले..”, देवेंद्र फडणवीस यांचं खुमासदार भाषण
raj thackeray cm devendra fadnavis
Raj Thackeray: …म्हणून राज ठाकरे विधानसभेला महायुतीत सहभागी झाले नाहीत, देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण; म्हणाले, “आमच्याकडे त्यांना…”!

हेही वाचा : Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी घेतली फडणवीस, राहुल नार्वेकरांची भेट; सुनील प्रभूंनी सांगितलं नेमकी चर्चा काय झाली?

नरहरी झिरवळ काय म्हणाले?

छगन भुजबळ यांच्या नाराजीसंदर्भात बोलताना नरहरी झिरवळ यांनी म्हटलं की, “छगन भुजबळ हे वरिष्ठ नेते आहेत. ते नाराज असल्याची चर्चा आहे. मात्र, त्यांच्या नाराजीचा परिणाम मतदारसंघावर किंवा कार्यकर्त्यांवर किंवा जिल्ह्यात होईल असं ते काही करणार नाहीत, असा आम्हाला विश्वास आहे. छगन भुजबळ यांच्याबाबत वरिष्ठ स्थरावर काय झालं? काय चर्चा झाली? हे आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना माहिती नाही”, असं नरहरी झिरवळ यांनी म्हटलं.

दरम्यान, राष्ट्रवादीत (अजित पवार) अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे तिघेच निर्णय घेतात. आम्हाला कोणत्याही निर्णयात सहभागी करून घेत नाहीत, असा आरोप भुजबळ यांनी आज माध्यमांशी बोलताना केला. या संदर्भात बोलताना नरहरी झिरवळ यांनी म्हटलं की, “आता तो त्यांचा विचार आहे. मात्र, आम्हाला असं वाटतं की छगन भुजबळ यांना ते (अजित पवार) डावलणार नाहीत. भुजबळांवर कोणताही अन्याय होणार नाही, अशा प्रकारची विनंती आम्ही पक्षाच्या वरिष्ठांना करणार आहोत”, असं नरहरी झिरवळ म्हणाले. तसेच पुढे बोलताना झिरवळ असंही म्हणाले की, “छगन भुजबळ यांना जरी आता थांबवलं असेल. पण कदाचित पुढे अजून मोठं काही होणार असेल. किंवा त्यांच्यासाठी अजून मोठं काही करणार असतील”, असं सूचक विधान त्यांनी केलं.

Story img Loader