नाशिक येथे रॅपिड अँटिजेंन टेस्टद्वारे सुरु असलेल्या तपासणी शिबिरात नवरीची बहिणच करोनाबाधित आढळून आल्याने गुरूवारी होणाऱ्या लग्नसमारंभातील असंख्य वऱ्हाडी मंडळी करोनाचा प्रादुर्भाव होण्यापासून बचावली. सिडकोत ही तपासणी झाली. महिलेचे विलगीकरण करून उपचार सुरू झाल्यामुळे नातेवाईकांचा जीव भांड्यात पडला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सध्या नाशिक येथील सिडकोतील प्रभागांमध्ये नगरसेवकांनी आरोग्य तपासणी मोहीम हाती घेतली आहे. यामुळे करोनाच्या धास्ती बाळगणारे नागरीक हळूहळू घराबाहेर पडून तपासणी करू लागल्याचे सकारात्मक चित्र बघायला मिळत आहे. त्यातील काहीजण निगेटिव्ह येत असल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढत असून जे कोणी पॉझिटिव्ह आढळून येत आहे, त्यांना आपल्यापासून इतर कोणी बाधीत होण्यापासून वाचल्याचे समाधान लाभत आहे. असाच काहीसा धक्कादायक परंतु दिलासादायक प्रसंग एका ठिकाणी करोना चाचणी शिबिरात निदर्शनास आला. यामुळे गुरूवारी होणाऱ्या लग्नसमारंभातील वर्‍हाडी मंडळी करोनाच्या प्रादुर्भाव होण्यापासून दूर राहिली.

भाजपाचे नगरसेवक मुकेश शहाणे यांनी खासगी डॉक्टरांच्या मदतीने रॅपिड अँटिजेंन टेस्ट आपल्या प्रभागात सुरू केली आहे. त्यास मोठ्या प्रमाणात रुग्णांचा प्रतिसाद मिळत आहे. यामध्ये काही जण पॉझिटिव्ह देखील आढळून आले आहे.

मंगळवारी एका महिलेची चाचणी करण्यात आली. त्यामध्ये ती पॉझिटिव्ह आली. नेमके याच महिलेच्या बहिणीचे गुरुवारी लग्न होते. त्यामुळे या महिलेचे घरी विलगीकरण करण्यात आले. तिच्यावर डॉक्टरांच्या माध्यमातून ऑनलाईन उपचार सुरू आहे. वेळीच चाचणी झाल्याने लग्नात अन्य मंडळी बाधित होण्यापासून बचावल्याची प्रतिक्रिया शिबिराचे आयोजक नगरसेवक मुकेश शहाणे यांनी व्यक्त केली. आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nashik brides sister corona tested positive nck