नाशिक – औरंगाबाद रस्त्यावर शनिवारी पहाटे डंपर-खासगी बसच्या अपघातात १३ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. एका खासगी लक्झरी बसने अपघातानंतर पेट घेतल्याने १३ जणांचा मृत्यू झाला. यात लहान मुलासह आईचाही समावेश आहे. अपघातग्रस्त बस क्रेनच्या सहाय्याने घटनास्थळावरून हलविण्यात आली. यावेळी एका बाळाच्या मृतदेहासहीत दोन मृतदेह आढळल्याने मृतांचा आकडा ११ वरुन १३ वर पोहोचला आहे. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पंतप्रधान सहाय्यता निधीमधून मरण पावलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या नेतावाईकाला दोन लाखांची मदत जाहीर केली आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपयांची मदत शासनाच्या वतीने जाहीर केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मराठीत ट्वीट करुन मृतांना श्रद्धांजली अर्पण करताना खेद व्यक्त केला आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही ट्वीटरवरुन आपल्या भावना मांडल्यात.
नक्की पाहा >> Nashik Bus Fire Accident: ११ जणांचा जागीच कोळसा झाला; मृतांमध्ये आई आणि बाळाचाही समावेश; पाहा थरकाप उडवणारे फोटो
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा