Nashik Crime महाराष्ट्रातलं तीर्थक्षेत्राचं शहर म्हणून नाशिककडे पाहिलं जातं. गेल्या काही दिवसांमध्ये या शहरात गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं आहे. या सगळ्याने कहर गाठला तो हर्षद पाटणकरच्या मिरवणुकीमुळे. कुख्यात गुंड हर्षद पाटणकरची नाशिकमध्ये थाटात मिरवणूक काढण्यात आली. त्यावेळी बॉस इज बॅक चे बॅनर आणि घोषणाबाजी झाली. तसंच या गुंडाला घेऊन त्याचे समर्थक नाचले. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
नेमकी काय घटना घडली? ( Nashik Crime News )
Nashik Crime एमपीडीए अंतर्गत कारागृहात हर्षद पाटणकर या कुख्यात गुंडाची नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातून सुटका करण्यात आली. यानंतर शरणपूर रोड परिसरात या गुंडाच्या समर्थकांनी त्याची जंगी मिरवणूक काढली. यावेळी एक रोड शोही पार पडला. या मिरवणुकीत तडीपार गुंड, सराईत गुन्हेगार तसंच टवाळखोरांचा सहभाग होता. महिंद्रा एसयुव्हीसह १० ते १५ बाईक या मिरवणुकीत दिसल्या. शरणपूर रोडवरच्या बैथल नगर ते आंबेडकर चौक, साधू वासवाणी रोड या भागांमधून हर्षद पाटणकरची मिरवणूक काढण्यात आली.
हे पण वाचा- नाशिक : मद्यतस्करीतील संशयितास तळोद्यातून अटक
हॉर्नचा आवाज, अर्वाच्च भाषेत शिवीगाळ
Nashik Crime News नाशिकच्या रस्त्यावर ही मिरवणूक आणि रोड शो सुरु असताना वाहनांच्या कर्णकर्कश हॉर्नच्या आवाजाने शरणपूर परिसर दणाणून गेला होता. याशिवाय, मिरवणुकीतील सहभागी झालेले टवाळखोर अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत होते. या सगळ्यांकडून ‘बॉस इज बॅक’च्या घोषणाही दिल्या जात होत्या. यानंतर हर्षद पाटणकरच्या समर्थकांनी सोशल मीडियावर काही व्हीडिओ अपलोड केले. हे व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून त्याची जोरदार चर्चा आहे. या घटनेची पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे. मिरवणूक काढून जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी, दहशत माजविल्याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या व्हायरल व्हिडीओनंतर पोलिसांचा धाक काही उरला आहे की नाही असा प्रश्न नाशिककर विचारत आहेत.
व्हिडीओत काय दिसतं आहे?
इंस्टाग्रामवर जो व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे त्या व्हिडीओत गुंड हर्षद पाटणकरला खांद्यावर घेऊन नाच होतो आहे. तसंच गोली मार भेजे मे या गाण्यावर नाच केला जातो आहे असं दिसतं आहे. तर दुसऱ्या व्हिडीओत त्याची शानदार मिरवणूक काढण्यात आल्याचं दिसतं आहे. बॉस इज बॅकचे बॅनर काहींच्या हातात आहेत. मिरवणुकीतले लोक त्या घोषणाही देताना दिसतं आहे. या घटनेचा Nashik Crime News व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
हर्षद पाटणकर कुख्यात गुंड
वर्षभरापूर्वी शहर पोलिसांनी झोपडपट्टी दादाविरोधी कायद्यान्वये हर्षद पाटणकर याच्यावर कारवाई झाली होती. त्याच्याविरोधात सरकारवाडा, पंचवटी, इंदिरानगर, उपनगर या पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. यात जबर दुखापत, चोरी, घरफोडी, शिवीगाळ व दमदाटी, खुनाचा प्रयत्न, हत्यार बाळगणे अशा गुन्ह्यांचा समावेश आहे.