संगमनेर : नाशिक पदवीधर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांच्या प्रचारकार्यात तालुक्यातील काँग्रेसचे कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. दरम्यान सत्ता आपल्याला नवीन नाही. बालपणापासून आपण सत्ता पाहत आलो आहोत. सुमारे शतकभर आमचा परिवार काँग्रेससोबत आहे. काँग्रेस पक्ष आपल्या रक्तातच आहे. पक्षातून निलंबित झाल्याचे दु:ख असले तरी योग्य वेळ आल्यावर आपण बोलू, असे प्रतिपादन सत्यजित तांबे यांनी केले आहे.

राज्य आणि देशात अनेक राजकीय स्थित्यंतरे झाली तरी संगमनेर तालुका मात्र गेली अनेक दशके काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे.  गेली चार दशके संगमनेर तालुक्यावर काँग्रेस अर्थात बाळासाहेब थोरात यांनी सतत वर्चस्व राखले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांतील किरकोळ अपवाद वगळता सर्व सत्तास्थाने काँग्रेस म्हणजेच थोरात यांच्या ताब्यात आहेत. तांबे परिवाराचे राजकारण थोरात यांच्या आशीर्वादाने उभे राहिले असले तरी हे दोन्ही परिवार सतत एकमेकाला पूरक राहिले आहेत.

Work begins on Shirsodi Kugaon bridge in the catchment area of ​​Ujani Dam Pune news
इंदापूर-करमाळा ऋणानुबंध पुन्हा जुळणार; शिरसोडी-कुगाव पुलाच्या कामाला सुरुवात
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
process of regularizing project affected constructions gained momentum after return of mahayuti government
गरजेपोटी बांधकामांच्या नियमितीकरण प्रक्रियेला वेग; तांत्रिक मूल्यमापनाचे काम अंतिम टप्प्यात
Devendra Fadnavis Nagpur visit cancelled
प्रथम १२, नंतर १३ आणि आता १५, फडणवीसांच्या नागपूर दौऱ्याचा मुहूर्त का लांबला ?
Pune, sewage channels covering Pune, Pune Municipal Corporation, sewage pune, pune latest news,
पुणे : सांडपाणी वाहिन्यांची झाकणे समपातळीवर आणण्यासाठी महापालिकेने उचलले पाऊल !
loksatta readers feedback
लोकमानस: …त्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी!
Rock dove bird pune, Rock dove, Municipal Corporation pune, pune,
पुणे : पारव्यांना खाद्य टाकताय सावधान…! महापालिका वसूल करणार ‘एवढा’ दंड
ministerial post, west varhad, vidarbha
पश्चिम वऱ्हाडात मंत्रिपदाची कुणाला ‘लॉटरी’?

“२२ वर्षं मी काँग्रेसमध्ये काम केलंय, मला फक्त…”, सत्यजीत तांबेंची काँग्रेसमधून निलंबनावर सूचक प्रतिक्रिया!

या पार्श्वभूमीवर नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत तांबे परिवाराने काँग्रेसशी बंडखोरी करत घेतलेल्या निर्णयाने तालुक्यात अभूतपूर्व राजकीय परिस्थिती निर्माण झाली. तालुका आणि शहरातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी तांबे परिवारावरही अतोनात प्रेम केले, मात्र त्यांच्या अंतिम निष्ठा या थोरात यांच्यावरच आहेत. तांबे यांच्या निर्णयाने तालुक्यातील काँग्रेसचे कार्यकर्ते प्रचंड संभ्रमात पडले. यावरून कार्यकर्त्यांमध्ये सरळ सरळ दोन मतप्रवाह निर्माण झाले. आमदार थोरात यांची सहमती असल्याशिवाय एवढा मोठा निर्णय तांबे परिवार घेऊ शकणार नाही, असा मतप्रवाह असणारा मोठा वर्ग तर तांबे परिवाराने काँग्रेस पक्षालाच नाही तर आमदार थोरात यांनाही फसविले असा मानणाराही एक मतप्रवाह निर्माण झाला. पक्षातीलच काही कुटील कारस्थानी नेत्यांनी सत्यजित तांबे यांच्यापुढे संकट उभे केले असेही बोलले जात होते.

तांबे यांच्यासोबत असलेला मोठा युवावर्ग याही निवडणुकीत प्रथमपासूनच त्यांच्यासोबत आहे. ‘जिकडे तांबे तिकडे आम्ही’ अशी या युवकांची धारणा आहे. मात्र जुने जाणते काँग्रेस आणि थोरातनिष्ठ कार्यकर्ते थोडी सावधानतेची भूमिका घेताना दिसत होते. आता मात्र एक एक करत ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्ते, पदाधिकारी सत्यजित तांबे यांच्यासोबत प्रचार कार्यात दिसत आहेत.

‘…आता मलाही आपण एक संधी द्यावी’; सत्यजित तांबे यांचे नागरिकांना आवाहन

शुभांगी पाटलांना थोरात यांच्या बंगल्यात अडवले

महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील या आज प्रचारानिमित्त संगमनेर तालुक्याच्या दौऱ्यावर होत्या. महाविकास आघाडीतील घटक पक्षाचे महत्त्वाचे नेते म्हणून त्या माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या शहरातील निवासस्थानी दाखल झाल्या. त्यांनी वारंवार विनंती करूनही बंगल्याच्या सुरक्षारक्षकाने गेट उघडण्यास नकार दिला. साहेब आणि त्यांचा परिवार मुंबईत असल्याचे सुरक्षारक्षकाने सांगितले. अखेर शुभांगी पाटील यांना बंगल्यात प्रवेश न मिळता निराश मनाने तेथून जावे लागले.

Story img Loader