राज्यात होऊ घातलेल्या शिक्षक-पदवीधर विधानपरिषदेच्या निवडणुकांमधील उमेदवारीचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. आज (१६ जानेवारी) दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची शेवटची मुदत होती. सकाळपासून अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. विशेषतः नाशिक पदवीधरमध्ये कुणात लढत होणार याबाबत अनेक चर्चा झाल्या. अखेर तीन वाजेपर्यंत शुंभागी पाटील यांनी आपला अर्ज मागे घेतलाच नाही. मात्र भाजपचे समर्थक धनराज विसपुते आणि धनंजय जाधव यांनी माघार घेतल्यामुळे नाशिकमध्ये सत्यजित तांबे विरुद्ध शुभांगी पाटील विरुद्ध सुभाष जंगले अशी थेट लढत होणार आहे. मात्र पाचही मतदारसंघापैकी एकाही मतदारसंघात शिंदे गटाचा स्वतःचा उमेदवार निवडणुकीसाठी उभा नाही.

नाशिक पदवीधर मतदारसंघ

आज सकाळपासून शुभांगी पाटील नॉट रिचेबल होत्या. शुभांगी पाटील यांनी उमेदवारी अर्ज माघारी घ्यावा, यासाठी भाजपा प्रयत्नशील असल्याची चर्चा होती. त्यामुळे शुभांगी पाटील उमेदवारी अर्ज मागे घेतील, अशीही अफवा पसरली होती. परंतु, ही शक्यता फोल ठरली. तर दुसरीकडे शुभांगी पाटील यांना पाठिंबा देण्याऐवजी सुभाष जंगले यांना पाठिंबा द्यावा अशी मागणी ठाकरे गटाचे माजी मंत्री बबनराव घोलप यांनी केली होता. मात्र याबाबत ठाकरे गटाकडून अधिकृत भूमिका जाहीर केलेली नाही. त्यामुले सत्यजित तांबे, शुभांगी पाटील आणि सुभाष जंगले यांच्यामध्ये लढत होईल. तसेच आज सहा जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले असून एकूण १६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

Maharashtra FM Ajit Pawar on state budget
राज्याच्या अर्थसंकल्पात ‘लाडक्या बहिणी’, सामान्य नागरिक केंद्रबिंदू; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दावा
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
There was no competition for post of guardian minister of Satara says Shambhuraj Desai
साताऱ्याच्या पालकमंत्रिपदासाठी स्पर्धा नव्हतीच- शंभूराज देसाई
palghar social worker Ashok Dhodi kidnapped murdered
अशोक धोडी यांचे अपहरण करून हत्या ; वाहनासह मृतदेह बंद दगड खदानीत
Vijay Ghaywat, jail, Nagpur, loksatta news,
नागपूर : विकृत विजय घायवटची पुन्हा कारागृहात रवानगी
बुलढाणा : कुंभमेळ्यात भाविक महिला बेपत्ता, संपर्क होईना, कुटुंबीय हवालदिल
In Khadakpada area of ​​Kalyan West transgender beaten woman and her little daughter for 20000
कल्याणमधील खडकपाडा येथे तृतीय पंथीयांकडून महिलेला मारहाण
Hasan Mushrif statement on Kolhapur boundary extension in marathi
कोल्हापूर हद्दवाढीत लोकप्रतिनिधीच आडवे; हसन मुश्रीफ यांचे टीकास्र

हे वाचा >> उमेदवारी अर्जाच्या गोंधळाची राज्यात जुनीच परंपरा

नागपूर शिक्षक मतदारसंघ

नागपूर शिक्षक मतदारसंघातही अनेक नाट्यमय वळणे पाहायला मिळाली. नागपूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने गंगाधर नाकाडे यांना मैदानात उतरवलं होतं. मात्र गंगाधर नाकाडे यांनी अर्ज मागे घेतला. नागपूरमध्ये भाजपचे वर्तमान आमदार नागो गाणार आणि काँग्रेसच्या सुधाकर आडबोले यांच्यात थेट लढत होईल. मात्र यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश इटकेलवार यांनी आपला अर्ज मागे घेतलाच नाही, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्यावर कारवाई करत त्यांना पक्षातून निलंबित केले आहे.

अमरावती पदवीधर मतदारसंघ

अमरावती पदवीधर मतदारसंघात अमरावतीची जागा महाविकास आघाडीमधील काँग्रेसने मिळवली आहे. काँग्रेसकडून धीरज लिंगाडे आणि त्यांच्याविरोधात भाजपचे विद्यमान आमदार रणजित पाटील अशी ही लढत असेल.

हे वाचा >> नाशिक पदवीधरमध्ये कोण कोणाचे हा संभ्रम

कोकण शिक्षक मतदारसंघ

कोकण शिक्षक मतदारसंघातून शेकापचे नेते, विद्यमान आमदार बाळाराम पाटील हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. त्यांनाच पुन्हा संधी देण्यात आली आहे आणि महाविकास आघाडीनेही त्यांना पाठिंबा दर्शवला आहे. त्यांच्याविरोधात भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे निवडणुकीत उतरले आहेत.

हे वाचा >> ज्ञानेश्वर म्हात्रे नक्की कुणाचे? भाजपचे की शिंदे गटाचे?

औरंगाबाद शिक्षक मतदारसंघ

औरंगाबाद शिक्षक मतदारसंघ हा अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे आहे. विद्यमान आमदार विक्रम काळे यांनाच पुन्हा संधी देण्यात आली आहे. दुसरीकडे भाजपाने काँग्रेसमधून आयात केलेले किरण पाटील निवडणुकीत उतरवले आहेत. काळे यांनी याआधी दोन टर्म काम केल्यामुळे त्यांना ही निवडणूक तशी अवघड नाही.

आता या पाचही मतदारसंघात ३० जानेवारी रोजी मतदान होणार आहे. तर मतमोजणी २ फेब्रुवारी २०२३ रोजी होणार आहे. या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे आता २ फेब्रुवारी रोजी कळेल.

Story img Loader