स्थानिक गुन्हे शाखेच्या मालेगाव पथकातील अधिकारी व कर्मचारी गुरुवारी रात्री मालेगाव शहरात गस्त घालत असताना गिरणा पूल परिसरातून एका सराईत गुन्हेगारास ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे देशी बनावटीचा एक गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसे सापडली. त्याने दिलेल्या कबुली नंतर अजून एक गुन्हेगार पथकाच्या ताब्यात आला.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर नवले यांना मिळालेल्या माहितीनुसार, मालेगाव गिरणा नदी पूल परिसरात काही सराईत गुन्हेगार संशयितरित्या फिरत होते. पथकाने पुलाजवळील गिरणा चौपाटी परिसरात रात्रभर सापळा रचून सराईत गुन्हेगार मोहम्मद शहाबाज उर्फ कमांडो मोहंमद युसूफ (रा. गोल्डन नगर, मालेगाव) यास ताब्यात घेतले. आरोपीची झडती घेतली घेतली असता त्याच्याकडे देशी बनावटीचा १ गावठी कट्टा व २ जिवंत काडतुसे सापडली. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याविरुद्ध मालेगाव छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा