अजित पवार यांचा शपथविधी २ जुलै २०२३ रोजी झाला. त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एक राजकीय भूकंप झाला आहे. अजित पवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तर छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे यांच्यासह एकूण नऊ जणांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. यानंतर राष्ट्रवादीत दोन गट पडले आहेत. एक शरद पवार गट आणि दुसरा अजित पवार गट. राष्ट्रवादी काँग्रेसच्या देवळालीच्या आमदार सरोज अहिरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पाठिंब्याच्या पत्रावर सही केली आहे. त्यांनी रविवारी म्हणजेच २ जुलैला नेमकं काय घडलं तो घटनाक्रम सांगितला आहे.

काय म्हटलं आहे सरोज अहिरे यांनी?

मी अजित पवार यांचीही भेट घेतली तसंच शरद पवार यांचीही भेट घेतली. खासदार सुप्रिया सुळेंशीही माझं बोलणं झालं आहे आणि शरद पवार यांच्या गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशीही माझं बोलणं झालं आहे. माझ्यासाठी शरद पवार आणि अजित पवार एकच नाणं आहेत. आम्ही पक्ष म्हणून त्यांच्याबरोबर आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आमचा परिवार आहे. मी आमच्या परिवाराबरोबर आहे. आज दोन वेगवेगळे मेळावे पार पडले. सगळ्यांशी चर्चा केल्यानंतर मी माझ्या मतदारसंघाच्या वतीने भूमिका स्पष्ट करणार आहे असं आता सरोज अहिरे यांनी सांगितलं.

Eknath Shinde on Santosh Deshmukh Murder Case
Eknath Shinde: “कुणाचेही लागेबंधे असले तरी…”, संतोष देशमुख प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा इशारा
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Guardian Minister Controversy
Manikrao Kokate : पालकमंत्री पदाचा तिढा कधी सुटणार? अजित पवार गटाच्या नेत्याचं मोठं विधान; म्हणाले, “आता निर्णय…”
Devendra Fadnavis Speech
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याने हास्यकल्लोळ, “सकाळचा शपथविधी नको म्हणून यावेळी आम्ही संध्याकाळी…”
What Devendra Fadnavis Said About Uddhav Thackray?
Devendra Fadnavis : “चंद्रपूरचे आपण सगळेच वाली! कुणीही सुग्रीव नाही, मी कुणासारखा जोक…”; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला?
Image of Ajit Pawar
Ajit Pawar : “पक्ष वगैरे न बघता…” धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर अजित पवारांची मोठी प्रतिक्रिया
Sanjay Raut On Municipal Corporation election
Sanjay Raut : मुंबई महापालिकेची निवडणूक ठाकरे गट स्वबळावर लढणार? संजय राऊतांचं मोठं भाष्य; म्हणाले, “दिल्लीत जे घडलं तेच…”
Suresh Dhas on Dhananjay Munde
Suresh Dhas : “मी धनंजय मुंडेंचा राजीनामा….”, अजित पवारांच्या भेटीनंतर काय म्हणाले सुरेश धस?

२ जुलैच्या रविवारी नेमकं काय झालं?

मला अजित पवारांनी बोलवलं होतं, त्यामुळे मी गेले होते. माझं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे काम होतं. कारण त्यांच्याकडे उर्जा खातंही आहे. एकलहरा प्रकल्पाचा प्रश्न प्रलंबित आहे. अजित पवार विरोधी पक्षनेते असल्याने मी त्यांच्याकडे पाठपुरावा करत होते आणि त्यांच्या माध्यमातून एक बैठक नियोजित करुन द्या असं मी त्यांना सांगितलं. कार्यालयातून मला फोन आला की देवगिरी बंगल्यावर अजित पवार आहेत. मी कामानिमित्त गेले होते. तिथे सगळे आमदार सह्या करत होते त्यामुळे मी पण सही केली. अजित पवारांबरोबर मी राजभवनावर गेले. तिथे शपथविधी पार पडला. मी त्या कार्यक्रमालाही गेले होते. पण नंतर मी तिथून निघाले. त्यानंतर मी सुप्रिया सुळेंना भेटले. मी शरद पवार यांचीही भेट घेतली. माझी ट्रिटमेंट नाशिकला सुरु होती. त्यामुळे मी इथे आले आहे. तसंच माझं बाळही माझ्या बरोबर होते.

कुठल्या कागदावर सही केली ते पाहिलं नाही का?

आमच्या पक्षाच्या नेत्यांवर आमचा आंधळा विश्वास आहे. त्यामुळे आम्ही आंधळेपणाने विश्वासाने सही केली होती. मी एकटीनेच सही केली नाही तर अनेक आमदारांनी सह्या केल्या. सह्या झाल्यानंतर जेव्हा राजभवनाकडे चला असं सांगितल्यावर थोडा मनात विचार आला की हे सगळं काय चाललं आहे? त्यानंतर मी दादांशी बोलले. त्यांनी काही गोष्टी सांगितल्या. मी माझ्या मनातल्या संभ्रमाविषयी शरद पवार यांच्याशीही बोलले. जे काही झालं त्याला मी विश्वासघात म्हणणार नाही. मात्र जे काही झालं ते मी माझ्या मतदारसंघात बोलणार आहे त्यानंतर मी पुढचा निर्णय घेणार आहे असंही सरोज अहिरे यांनी सांगितलं.

सगळे आमदार आज मुंबईला गेले पण त्याआधी मी मतदारसंघात गेले होते. त्यांनी चर्चा केलीच असणार. मुळात शरद पवार आणि अजित पवार यांच्यातला एक नेता निवडायचा असेल तर माझ्यासाठी कठीण आहे. असंही सरोज अहीरे यांनी स्पष्ट केलं.

Story img Loader