राज्य पोलीस दलात कार्यरत असलेल्या भारतीय पोलीस सेवेतील बदल्या आणि बढत्यांचा आदेश गृहमंत्रालयाने बुधवारी प्रसिद्ध केला. बदली करण्यात आलेल्यांमध्ये धडक कारवाई आणि आपल्या निर्णयांमुळे चर्चेत असलेले नाशिक शहरचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांचाही समावेश आहे. दीपक पांडे यांची राज्य पोलिसांच्या महिला अत्याचार प्रतिबंधक विभागात विशेष पोलीस महानिरीक्षक पदावर नेमणूक करण्यात आली आहे. दीपक पांडे यांनी काही दिवसांपूर्वी कोणत्याही मशिदीच्या १०० मीटरच्या परिसरात अजानच्या आधी आणि नंतर १५ मिनिटं लाऊडस्पीकरवर भजन किंवा गाणी वाजवण्याची परवानगी दिली जाणार नाही असा निर्णय जाहीर केला होता. त्यानंतर लगेचच त्यांची बदली झाली असल्याने चर्चा रंगली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या व बढत्या
दरम्यान दीपक पांडे यांनी महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक रजनीश शेट यांना पत्र लिहून सरकारवर टीका केली होती. यावेळी त्यांनी महसूल अधिकारी आणि कार्यकारी दंडाधिकारी यांचा उल्लेक आरडीएक्स आणि डिटोनेटर असा केला होता. बदलीनंतर त्यांच्या या पत्राबद्दलही चर्चा सुरु आहे.
दीपक पांडे यांनी नाशिकमधील धार्मिक स्थळांना लाऊडस्पीकरच्या वापरासाठी परवानगी घेण्याचा आदेश दिला होता. “३ मेपर्यंत सर्व धार्मिक स्थळं, ज्यामध्ये मंदिर, मशिदी, गुरुद्वारा तसंच अन्य धार्मिक स्थळांना भोंग्यांची परवानगी घ्यावी लागेल. ३ मे नंतर आयुक्तांच्या लेखी परवानगीशिवाय भोंगे वाजवल्यास भोंगे जप्त करण्यात येतील. तसंच त्या व्यक्तींविरोधात गुन्हे दाखल केला जाईल,” असंही त्यांनी स्पष्ट केलं होतं. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेल्या ३ मे च्या अल्टिमेटमच्या पार्श्वभूमीवर हे आदेश देण्यात आले होते.
पत्रामुळे निर्माण झालेला वाद
दरम्यान दीपक पांडे यांनी महासंचालकांना लिहिलेल्या पत्रात महसूल अधिकारी भूमाफियांसोबत हातमिळवणी करत लोकांना त्रास देत असल्याचा आरोप केला होता. महसूल अधिकारी आणि कार्यकारी दंडाधिकारी यांचे अधिकार पोलिसांना द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली होती. त्यांच्या या पत्रामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. दीपक पांडे यांनी पत्रात वापरलेल्या भाषेवर राज्य मंत्रिमंडळाने नाराजी जाहीर केली होती.
राज्यातील अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या
मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचे प्रमुख सहआयुक्त मिलिंद भारंबे यांच्या खांद्यावर राज्याच्या कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी देत विशेष पोलीस महानिरीक्षक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. तर भारंबे यांच्या जागी सुहास वारके हे मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचे सहआयुक्त म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत. व्हीआयपी सुरक्षा विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक जयंत नाईकनवरे यांना बढती देऊन नाशिक शहर पोलीस उपायुक्त पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
पुणे शहराचे सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांची राज्य मानवी हक्क आयोग येथे विशेष पोलीस महानिरीक्षकपदी नियुक्ती करत मुंबई पोलीस दलातील पश्चिम प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांना बढती देत पुणे शहर सहआयुक्तपदी नेमणूक करण्यात आली आहे. ठाणे शहराचे सहआयुक्त सुरेशकुमार मेकला यांची गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे येथे विशेष पोलीस महानिरीक्षकपदी नेमणूक करण्यात आली आहे.
पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांची राज्याच्या व्हीआयपी सुरक्षा विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली असून सुधारसेवा विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक अंकुश शिंदे यांच्यावर पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक लख्मी गौतम यांना बढती देत राज्य पोलीस दलाच्या आस्थापना विभागाच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी, मुंबई पोलीस दलातील वाहतूक शाखेचे अपर पोलीस आयुक्त सत्यनारायण यांना बढती देत राज्याच्या सागरी सुरक्षेच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी आणि मीरा-भाईंदर-वसई-विरार आयुक्तालयातील अपर पोलीस आयुक्त एस. जयकुमार यांना बढती देत राज्य पोलीस दलाच्या प्रशासन विभागाच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी नियुक्ती देण्यात आली आहे.
मुंबई पोलीस दलातील उत्तर प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त प्रवीणकुमार पडवळ यांना बढती देत मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या सहपोलीस आयुक्तपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर मुंबई पोलीस दलातील सशस्त्र दलाचे अपर पोलीस आयुक्त वीरेंद्र मिश्रा यांची मुंबईतील उत्तर प्रादेशिक विभागाच्या अपर पोलीस आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे.