सांगली येथे आयोजित किशोर-किशोरी गट राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धेसाठी जिल्हा किशोर संघाचे नेतृत्व विजय ढवण तर किशोरी संघाचे नेतृत्व रोहिणी गुंबाडे करणार आहे. दोन्हीही संघाचे प्रशिक्षण शिबीर पंचवटीतील श्रीराम विद्यालय येथे झाले. दोन्ही संघांचा गणवेश वाटप व निरोप समारंभ तरुण ऐक्य मंडळाचे सचिव बाबुराव मुखेडकर यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी जिल्हा खो-खो संघटनेचे अध्यक्ष रमेश भोसले उपस्थित होते. किशोर संघात गौरव कापडणीस, विजय ढवण, शुभम गंगेकर, विनायक कराळे, संकेत काळे, गणेश शिरसाठ, अनिकेत अहिरे, अतुल पाटील, गणेश राठोड तर किशोरी संघात सुरेखा पाडवी, प्रमिला पिठे, सोनाली जाधव, वनिता वार्डे, भावना राठोड, दीपाली चौधरी, मंजुळा दुमड, रोहिणी गुंबाडे, कविता वाडेकर यांचा समावेश आहे.

Story img Loader