शहरातील के. एन. केला हायस्कूलमधील १७ वर्षांआतील मुलींच्या हॉकी संघाने मुंबई येथील राज्यस्तरीय शालेय हॉकी स्पर्धेत तसेच नाशिक जिल्हा हॉकी संघाने फलटण येथील स्पर्धेत मुंबई संघाला धोबीपछाड दिल्यामुळे १७ वर्षांखालील गटात सहा जणींची राज्य हॉकी संघात तर तीन मुलींची राष्ट्रीय संघात निवड झाली आहे. येथील भुजबळ फाऊंडेशनच्या वतीने महिला हॉकी संघाचा व प्रशिक्षकांचा गौरव करण्यात आला.
राज्यस्तरीय स्पर्धेत १७ वर्षांखालील मुलींच्या गटात नाशिकने विजेतेपद पटकावले. ही स्पर्धा मुंबई जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या वतीने झाली होती. या स्पर्धेत नाशिक विभागाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या के. एन. केला हायस्कूलच्या खेळाडूंनी मातीच्या मैदानावर सूर्यप्रकाशात खेळण्याची सवय असतानाही अ‍ॅस्ट्रोटर्फवर प्रकाशझोतात उत्तम खेळ करून मुंबईवर २-१ अशी मात केली. या स्पर्धेत नाशिकची कर्णधार सेंटर हाफ यशश्री गोहाड, गोलकीपर समृद्धी साळी, मोहिनी आलावा, फॉरवर्ड आशना पाराशर, रोहिणी खराटे, चेतना हितांगे, रचना एखंडे, साक्षी उगले, वैष्णवी वाघ, साक्षी पगार, तनिष्का गरूड, उन्नती जाधव, जयश्री खराते, शिल्पा विश्वकर्मा, मनीषा आलावा, पूजन जाधव, मृणाल सोमवंशी आदींनी उत्कृष्ट सांघिक खेळाचे प्रदर्शन केल्याचे प्रशिक्षक अजिज सय्यद यांनी सांगितले. फलटणच्या स्पर्धेत नाशिकची कर्णधार राजश्री बॅनर्जी, स्नेहा पवार, पायल चुंबळे, सुप्रिया गांगुर्डे आदींचा समावेश होता. या यशामुळे अ‍ॅथलिटपाठोपाठ हॉकी खेळावर नाशिकचे राज्यभरात वर्चस्व प्रस्थापित झाल्याचे भुजबळ फाऊंडेशनच्या शेफाली भुजबळ यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा