भारतात सातत्याने दहशतावीद कृत्ये होत असतात. अनेक सरकारी यंत्रणांना धमक्यांचे फोन येतात. त्यामुळे देशातील सुरक्षा यंत्रणा सतत अलर्ट मोडवर असते. देशात अशाप्रकारे दहशत माजवणाऱ्या आणि दहशतवादी कृत्यांना पाठिंबा देणाऱ्या १५ लोकांना आज राष्ट्रीय तपास यंत्रणेने अटक केली आहे.
राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) आज (दि. ९ डिसेंबर) धाडसत्र राबवून महाराष्ट्र आणि कर्नाटकातील ४४ ठिकाणी छापेमारी केली. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार कर्नाटमध्ये १, तर महाराष्ट्रात ४३ ठिकाणी कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये पुणे २, ठाणे ग्रामीण ३१, ठाणे शहर ९ आणि भाईंदरमधील एका ठिकाणाचा समावेश आहे. दरम्यान, याबाबत राष्ट्रीय तपास यंत्रणेने अधिकृत माहिती दिली आहे.
NIA ने दिलेल्या माहितीनुसार एएनआय या वृत्तसंस्थेने वृत्त दिले आहे. त्यानुसार, ISIS वर मोठ्या प्रमाणावर कारवाई करताना, राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) आज महाराष्ट्र आणि कर्नाटकात अनेक आणि व्यापक छापे टाकून प्रतिबंधित दहशतवादी संघटनेच्या १५ जणांना अटक केली. एनआयएच्या पथकांनी आज पहाटे महाराष्ट्रातील पडघा-बोरिवली, ठाणे, मीरा रोड आणि पुणे आणि कर्नाटकातील बेंगळुरू येथे तब्बल ४४ ठिकाणी धाड टाकली. दहशतवाद, दहशतवादी कृत्ये आणि दहशतवादी कृत्यांना प्रोत्साहन देणाऱ्या १५ आरोपींना अटक केली.
हेही वाचा >> NIA ची मोठी कारवाई; महाराष्ट्रात ४३ ठिकाणी छापेमारी, भिवंडी-ठाण्यात इसिस कनेक्शन?
NIA ने छापे मारताना मोठ्या प्रमाणात बेहिशेबी रोखरक्कम, बंदूक, धारदार शस्त्रे, गुन्ह्यातील दस्तऐवज, स्मार्टफोन आणि इतर डिजिटल उपकरणे जप्त केली आहेत. ISIS च्या हिंसक कारवाया करण्याच्या प्रयत्नांना आळा घालण्यासाठी NIA ने हे धाडसत्र राबवले, अशीही माहिती NIA ने दिली.
या दहशतवादी संघटनांनी भारतात इस्लामिक शासन प्रस्थापित करण्याकरता समविचारी तरुणांनी आपल्या गटात सामील करून घेतले होते, असंही ANI ने वृत्तात म्हटलं आहे.