मुंबई येथे १५ जून पासून तीन दिवसीय आयोजन
नेतृत्व, लोकशाही, प्रशासन आणि शांतता प्रिय समाज निर्माण करण्यासाठी देशातील चार हजार तीनशे आमदार राष्ट्रीय विधायक संमेलनासाठी एकत्रित येणार असल्याची माहिती विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी साताऱ्यात पत्रकार परिषदेत दिली
देशातील सर्व आमदार एकाच व्यासपीठावर विचार विनिमय करणार आहेत .पुणे येथील एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्मेंट तर्फे आयोजित राष्ट्रीय विधायक संमेलन, भारत हे मुंबई येथील बीकेसी जिओ सेक्टरमध्ये १५ ते १७ जून दरम्यान होणार आहे. देशातील सर्व विधानसभा विधान परिषदेचे अध्यक्ष व सभापती यांच्या सहकार्याने हे संमेलन होत असल्याची माहितीही रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिली.यावेळी एमआयटी राष्ट्रीय सरपंच संसदेचे प्रमुख समन्वयक योगेश पाटील भक्ती जाधव संगीता साळुंखे रवींद्र पाटील विक्रम सिंह जाधव आदी उपस्थित होते .
रामराजे म्हणाले, राष्ट्रनिर्माण ,राष्ट्रीय एकात्मता, राष्ट्रीय सर्वांगीण शाश्वत विकास या मध्यवर्ती विचार त्रिसूत्रीचा प्रमुख उद्देश ठेवून हे संमेलन आयोजित करण्यात आले आहे .या संमेलनाचे उद्घाटन १६जून रोजी आहे १७ जून रोजी समारोप होईल .लोकसभेच्या माजी सभापती सुमित्र महाजन, डॉ मीरा कुमार, शिवराज पाटील चाकूरकर, मनोहर जोशी, तसेच लोकसभेचे सभापती ओम बिर्ला हे या संमेलनाचे मार्गदर्शक व संयोजक आहेत. एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्मेंट चे संस्थापक अध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड यांच्या विचार चिंतनामधून राष्ट्रीय विधायक संमेलन भारत ही संकल्पना साकारली आहे. ते या संमेलनाचे प्रमुख संयोजक समन्वयक आहेत .या संमेलनात सार्वजनिक जीवनातील तणाव, व्यवस्थापन शाश्वत विकासाची साधने आणि प्रभाव कल्याणकारी योजना शेवटच्या व्यक्तीचे उत्थान आर्थिक कल्याणासाठी तंत्रज्ञानाचा स्वीकार आणि कौतुकास्पद विधान पद्धती सामाजिक कल्याणासाठी सहयोग नोकरशहा आणि आमदार या विषयावर चर्चा होणार आहे.
साताऱ्याच्या लोकसभा निवडणुकीत रामराजे नाईक निंबाळकर यांनी उमेदवारी करावी अशी अनेकांची इच्छा आहे आणि तशी चर्चाही सध्या सर्वत्र सुरू असल्याचे त्याबाबत विचारले असता व आपण सातारा की माढा कुठून उभे राहणार असेही विचारले असता रामराजे म्हणाले या मागणीचा योग्य वेळी योग्य मान राखला जाईल.