अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मेळघाटात नुकतंच दहिहंडी स्पर्धेचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमात त्यांनी आदिवासी मुलांसोबत डान्स केला आहे. दरम्यान, त्यांनी उपस्थित नागरिकांना संबोधित करताना डायलॉगबाजी देखील केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“नवनीत नाम सुनके, फ्लावर समझे क्या, फायर है मैं” हा डायलॉग त्यांनी व्यासपीठावरून म्हणून दाखवला आहे. हा डायलॉग बोलून दाखवताना त्यांनी ‘पुष्पा’ फेम अभिनेता अल्लू अर्जुन प्रमाणे हनुवटीखालून हातही फिरवला आहे. त्यांच्या या डायलॉगबाजीला उपस्थित नागरिकांनी जोरदार प्रतिसाद दिला आहे.

हेही वाचा- राणा दाम्पत्यास न्यायालयाचा दिलासा; जामीन रद्द करण्याची पोलिसांची मागणी फेटाळली

दरम्यान, नवनीत राणा यांनी आपले पती व आमदार रवी राणा यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. आमची जोडी म्हणजे, “शांत नवरा आणि तडफदार बायको” अशी आहे. ते बिलकूल बोलत नाहीत आणि मी अजिबात शांत बसत नाही. पण ही तुमच्या सर्वांसाठी एक शिकवण आहे. नवरा असं बना की, बायकोला समोर ठेवा आणि आपण स्वत: मात्र एक पाऊल मागे राहा, असा नवरा रवी राणा आहेत, असं विधान नवनीत राणा यांनी केलं आहे.

हेही वाचा- Video : ‘चलो इश्क लडाए सनम’ म्हणत दहीहंडी कार्यक्रमामध्ये नवनीत राणांचा गोविंदासह धमाल डान्स, व्हिडीओ व्हायरल

नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा दरवर्षी मेळघाटातील अनेक गावांमध्ये जाऊन आदिवासी बांधवांसोबत दहीहंडी साजरी करतात. यावर्षीही ते मेळघाटातील विविध गावात गेले आणि आदिवासी नागरिकांसोबत दहीहंडी साजरी केली. विशेष म्हणजे यावेळी नवनीत राणा यांनी आदिवासी मुलांसोबत पारंपारिक आदिवासी नृत्य करत दहीहंडी उत्सव साजरा केला.