निवडणूक आयोगाने शिवसेना हे पक्षनाव तसेच धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह शिंदे गटाला दिले आहे. निवडणूक आयोगाच्या या निकालामुळे आगामी काळात राज्याच्या राजकारणात मोठे बदल होणार आहेत. दरम्यान, ठाकरे गटाने निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली जाईल, असे सांगितले आहे. याच निर्णयावर अमरातीच्या खासदार नवनीत राणा यांनी भाष्य केले आहे. उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाऊन बाळासाहेब ठाकरेंचा विचार जिवंत ठेवावा, असे नवनीत राणा म्हणाल्या आहेत. तसेच आगामी काळात शिवसेना भवनही शिंदे गटालाच मिळेल असा विश्वास राणा यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा >>> “धनुष्यबाण चोरणाऱ्यांना सांगतोय, हिंमत असेल तर…” मातोश्रीबाहेरून उद्धव ठाकरेंचं खुलं आव्हान

Eknath Shinde
Eknath Shinde : शिंदे गटाची महत्त्वपूर्ण बैठक संपल्यानंतर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
14 December Rashi bhavishya In Marathi
१४ डिसेंबर पंचांग: आज १२ पैकी ‘या’ राशींवर…
maharashtra government formation eknath shinde will be part of government led by devendra fadnavis
आज केवळ तिघांचाच शपथविधी? एकनाथ शिंदे मंत्रिमंडळात सहभागी; महसूल आणि नगरविकास खाती? मंत्र्यांच्या नावांवर खल
eknath shinde group upset over bawankule tweet on new maharashtra cm oath taking ceremony date
धुसफूस सुरूच; शपथविधीबाबत बावनकुळेंच्या घोषणेवर शिंदे गटातून नाराजीचा सूर
Ramdas Athawale on Eknath Shinde
Eknath Shinde : मुख्यमंत्रीपदाबाबत भाजपा हायकमांडने एकनाथ शिंदेंना काय सांगितले? रामदास आठवले म्हणाले…
Deepak Kesarkar eknath shinde devendra fadnavis
मुख्यमंत्रीपद की गृहमंत्रीपद, शिवसेनेची नेमकी मागणी काय? केसरकरांनी स्पष्टच सांगितलं
Gulabrao Patil On Uddhav Thackeray
Gulabrao Patil : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसणार? “ठाकरे गटाचे १० आमदार आमच्याकडे येण्याच्या तयारीत”, शिंदे गटाच्या नेत्याचा दावा
Congress office bearers and workers from Kalwa join BJP
ठाणे शहरात काँग्रेसला खिंडार! कळवा येथील काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

४० आमदार, १३ खासदार एका व्यक्तीला सोडून जात असतील तर…

“महाशिवरात्रीच्या निमित्ताने शंकरदेवाने उद्धव ठाकरे यांना खूप चांगला प्रसाद दिला आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी जी विचारधारा लोकांसमोर ठेवली होती, त्याच विचारधारेने शिवसेना पक्षाची स्थापना झाली होती. बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत एकनाथ शिंदे यांनी काम केलेले आहे. ४० आमदार, १३ खासदार एका व्यक्तीला सोडून जात असतील तर ती एक व्यक्ती चुकीची असते. एकनाथ शिंदे बहुमत तसेच विचाधारेला धरून काम करत होते, त्यांच्याच बाजूने हा निकाल लागलेला आहे,” असे नवनीत राणा म्हणाल्या.

हेही वाचा >>> ‘निवडणूक आयोगाने गंभीर चूक केली,’ कायदेतज्ज्ञ उल्हास बापटांचे मोठे विधान; म्हणाले, “हा निर्णय…”

त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जायला हवे

“उद्धव ठाकरे यांच्याकडे अजूनही वेळ आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेला उद्धव ठाकरेंना जिवंत ठेवायचे असेल, तर त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जायला हवे,” असा सल्ला नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरेंना दिला आहे. तसेच आगामी काळात शिवसेना भवन एकनाथ शिंदे यांनाच मिळणार आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

जो प्रभू राम, हनुमानाचा नसेल तर…

“महाराष्ट्रातील जनतेला हेच अपेक्षित होते. मागील अडीच वर्षांच्या काळात त्यांनी अनेक अत्याचार केले. जो प्रभू राम, हनुमानाचा नसेल तर तो काहीही कामाचा नाही. निवडणूक आयोगाने जो निकाल दिलेला आहे तो बहुमताच्या बाजूने दिला आहे,” असेही राणा म्हणाल्या.

हेही वाचा >>> निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर प्रकाश आंबेडकरांचे महत्त्वाचे विधान; म्हणाले, “उद्धव ठाकरेंचा…”

बहुमताला ग्राह्य धरूनच हा निर्णय-एकनाथ शिंदे

दरम्यान, धनुष्यबाण हे चिन्ह ओरबाडून घेण्याचा प्रयत्न केला तरी ते घेता येणार आहे. चोरी पचली असली तरी शेवटी चोर तो चोरच असतो, असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. तसेच खचून जाऊ नका. पुन्हा एकदा लढू, असे उद्धव ठाकरे त्यांच्या कार्यर्त्यांना उद्देशून म्हणाले आहेत. तर दुसरीकडे शिंदे गटाने निवडणूक आयोगाच्या या निकालाचे स्वागत केले आहे. लोकशाहीत बहुमताला महत्त्व असते आणि बहुमत आमच्याकडे आहे. निवडणूक आयोगाने बहुमताला ग्राह्य धरूनच हा निर्णय दिला आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

Story img Loader