Navneet Rana in Wari Update : लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या नवनीत राणा मधल्या काही दिवसांपासून राजकीय बातम्यांपासून दूर होत्या. परंतु, आज त्यांनी वारीत सहभाग दाखवला.यावेळी त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीला यश मिळावं म्हणून माऊलीकडे साकडं घातलं असल्याचं नवनीत राणा म्हणाल्या. त्या टीव्ही ९ मराठीशी बोलत होत्या. माजी खासदार नवनीत राणा आणि त्यांचे आमदार पती रवी राणा हे वाखरी आणि भंडीशेगाव दरम्यान पायी वारीत सहभागी झाले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

“लोकसभा निवडणुकीच्या काळात खोटा प्रचार केला गेला. खोटं जास्त दिवस चालत नाही. सत्य हे सत्य असतं. येणाऱ्या भविष्यात खोट्याचा प्रचार करणाऱ्यांना धडा नक्की शिकवणार आहे”, असं नवनीत राणा विरोधकांना म्हणाल्या. त्या पुढे म्हणाल्या, “महायुतीचं सरकार येण्यासाठी माऊलीच्या दर्शनाला आम्ही आलो आहे. महायुतीचं सरकार पुन्हा बसावं म्हणून आम्ही साकडे घालतो आहे.”

हेही वाचा >> आवा चालली पंढरपुरा…

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी तुमच्या नावाला विरोध होतोय, असा प्रश्न विचारला असता नवनीत राणा म्हणाल्या, “मी भाजपाची कार्यकर्ता आहे, रवी राणा हे महायुतीचे घटकपक्ष म्हणून गेल्या १० वर्षांपासून मोदींबरोबर आहेत, त्यामुळे मी त्यांच्याबरोबर काम करणार आहे.”

हेही वाचा >> “मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, Navneet Rana यांचं वक्तव्य चर्चेत

काहीतरी कमतरता राहिली असेल म्हणून पराभव झाला

“शेतकरी, शेतमजूर भगिनींसाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खूप कामे केली आहेत. या कामाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील जनत महायुतीला आशीर्वाद देईल”, असंही त्या पुढे म्हणाल्या. “जेव्हा मी निवडणूक लढले, तेव्हा स्वतःच्या विश्वासावर निवडणूक लढले. त्यामुळे माझा पराभव झाला. खूप संघर्ष आणि मेहनत घेतली होती. परंतु, कुठेतरी कमतरता राहिली असेल त्यामुळे पराभव झाला”, असं म्हणत त्यांनी त्यांचा पराभव स्वीकारला आहे.

हेही वाचा >> असाही श्रावणबाळ! पांडुरंगाच्या भेटीला आईला खांद्यावर घेऊन निघाला लेक; VIDEO पाहून डोळ्यांत येईल पाणी

आमदार रवी राणा वारकऱ्यांच्या पेहराव्यात दिसले. तर, नवनीत राणा यांनीही डोक्यावर तुळस ठेवून पायी वारी केली. तसंच, त्यांनी वारीतील महिलांबरोबर फुगडीही खेळली. त्यानंतर या राणा दाम्प्त्यानेही एकमेकांबरोबर फुगडी खेळली.