Navneet Rana Amaravati Conflict : अमरावतीमध्ये दर्यापूर विधानसभा मतदारसंघातील खल्लार या गावात नवनीत राणा यांच्या सभेदरम्यान शनिवारी रात्र राडा झाला. यावेळी नवनीत राणा यांचं भाषण सुरू असताना काही लोकांनी जोरदार घोषणाबाजी करत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी नवनीत राणा यांच्या दिशेने खुर्च्या फेकत काही लोकांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर आज नवनीत राणा यांनी माध्यमांशी संवाद साधत काल झालेल्या सभेत नेमकं काय घडलं होतं? याबाबत माहिती सांगितली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“ज्या गावात हा प्रकार घडला, ते गाव शिवसेना ठाकरे गटाच्या तालुकाध्यक्षांचं आहे. आधी व्यासपीठावरून गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी परवानगी दिल्यानंतर आम्ही सभेसाठी व्यासपीठ उभं केलं होतं. मात्र, त्यानंतर त्या सभेला मला उशीर झाला. हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर ते सभेसाठी आलेल्या महिला आणि लोकांबाबत अपशब्द बोलत होते. त्यांना बघून शिट्या मारत होते. अशा पद्धतीचा व्यवहार त्यांनी केला. आज उद्धव ठाकरे हे उद्धव बाळासाहेब ठाकरे नाही, तर जनाब उद्धव ठाकरे झाले आहेत, हे काल स्पष्ट दिसलं. पण ते विसरले आम्हीसुद्धा बाळासाहेबांचे विचार घेऊन चालत आहोत. बाळासाहेब ठाकरे व्यासपीठावर उभं राहून पाकिस्तानला सरळ उत्तर देण्याचं काम करत होते, मी त्यांची मुलगी म्हणून त्यांचे विचार घेऊन मैदानात आहे”, असं म्हणत नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्र डागलं.

हेही वाचा >> Navneet Rana : ‘खुर्च्या फेकल्या, माझ्यावर थुंकण्याचा प्रयत्न…’, अमरावतीमधील प्रचार सभेतील राड्यानंतर नवनीत राणा यांचे गंभीर आरोप

“कालच्या सभेत जवळपास २०० ते २५० अपंग लोक बसलेले होते. ते सर्व मला भेटण्यासाठी आले होते. ज्यावेळी मी सभेत भाषण करत होते. तेव्हा काहींनी वक्तव्य केले. त्यावेळी एवढ्या लांबून देखील अल्ला हू अकबरचे नारे ऐकू येत होते. त्यावेळी त्या ठिकाणी माझे काही कार्यकर्ते होते, ते ऐकत होते. तेव्हा काही चुकीचे शब्दही वापरण्यात आले. यावेळी माझ्या कार्यकर्त्यांनी त्यांना शांतता ठेवण्यास सांगितलं. आम्ही शांततेत सभा करून जाणार आहोत, असं आमच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं. मात्र, सभा संपल्यानंतर मी लोकांना भेटत होते. त्यावेळी मी लोकांशी संवाद साधत होते. तेव्हा तुला मारून टाकू, अशा पद्धतीची धमकी देण्यात आली. तरीही मी म्हटलं की शांतता ठेवा. पण त्याचवेळी लगेच काहींनी खुर्च्या उचलल्या आणि आमच्या लोकांवर फेकल्या. त्यानंतर आमच्या काही लोकांनी मला गाडीत बसवलं. मी नसते तर खल्लार गावातील दोन लोकांचा जीव त्या लोकांनी घेतला असता”, असा गंभीर आरोप नवनीत राणा यांनी केला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navneet rana says i am balasaheb thackerays daughter in amaravati case sgk